Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: राज्यावर अवकाळी पावसाचे सावट, हवामान विभागाकडून 3 दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी

Yellow Alert In Goa: राज्यात हवामान विभागानं (IMD) उद्यापासून (१ एप्रिल) पुढील ३ दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.

Sameer Amunekar

पणजी: राज्यात हवामान विभागानं (IMD) उद्यापासून (१ एप्रिल) पुढील ३ दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. या कालावधीत काही भागात हलक्या ते मध्यम शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पावसामुळं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.​

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हलक्या ते मध्यम पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. राज्याच्या उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये या हवामान बदलांचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गोव्यात मार्च ते मे या कालावधीत काजू आणि आंबा पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड आणि उत्पादन होतं. मात्र, हवामान बदलामुळं अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्याचा थेट परिणाम काजू, आंबा पिकांवर होऊ शकतो.

Goa Weather Update

काही दिवसांपूर्वी, सत्तरीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं कहर केला होता. खोतोडा, कुंभारखणसह सत्तरीतील इतर भागात मुसळधार पाऊस पडला होता. या पावसामुळं सत्तरीतील काही भागात पडझडीच्या घटनांसह वीजपुरवठाही खंडित झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT