goa  goa
गोवा

Goa Weather Update : राज्यात पाऊस @ ३५ इंच; सरासरीच्या तुलनेत ४ टक्के अधिक

Goa Weather Update : पर्वरी येथे पार्किंग करून ठेवलेल्या चार कारगाड्यांवर झाड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची हानी झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, राज्यात काही दिवस मंदावलेला पाऊस आता सक्रिय झाला असून आठवड्याभरात पावसाची जोरदार बरसात झाली आहे. राज्यात आठवड्याच्या सुरवातीला सरासरी पावसाच्या तुलनेत ७ टक्के पावसाची घट होती.

मात्र, आता राज्यात सरासरी पावसाच्या तुलनेत ४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. सोमवार ते शनिवारपर्यंत एकूण २८४.९ मि.मी. म्हणजेच ११.२१ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण ९०६.९ मि.मी. म्हणजेच ३५.७० इंच पावसाची नोंद झाली आहे.

गुरुवारी जोरदार पाऊस बरसल्यानंतर शुक्रवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती, परंतु शनिवारी सायंकाळपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. राज्यात पावसामुळे काही भागात झाडे कोसळण्याचे प्रकार घडले.

पर्वरी येथे पार्किंग करून ठेवलेल्या चार कारगाड्यांवर झाड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची हानी झाली. राज्यात रविवारी ताशी ४० ते ५० कि.मी. प्रति तास वेगाने वारे वाहण्याची तसेच पाऊस अधिक सक्रिय होण्याची शक्यता असून गोवा वेधशाळेने पुढील चार दिवस ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

सर्वाधिक पाऊस

मागील २४ तासांत राज्यात सर्वाधिक ७२.३ मि.मी. पावसाची नोंद वाळपई येथे झाली असून त्याखालोखाल सांगे ४३.५ मि.मी., मडगाव २८.८ मि.मी., म्हापसा २३.३ मि.मी., जुने गोवे १८.४ मि.मी., साखळी १६ मि.मी., पणजी १४.७ मि.मी., केपे १२ मि.मी., काणकोण ७.८ मि.मी., दाबोळी ६.६ मि.मी., तर मुरगाव येथे ४.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

आठवड्यातील पाऊस

तारीख पाऊस (मि.मी.मध्ये)

२४ जून २३.८

२५ जून २९.६

२६ जून ४३.२

२७ जून ८९.४

२८ जून ७७.७

२९ जून २१.२

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तरुणीची अजब ड्रायव्हिंग स्टाईल व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटीझन्स लोटपोट; म्हणाले, ''ब्रेकअप करुन आली...''

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT