Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: गोमंतकीयांसाठी पाच दिवस महत्वाचे, मुसळधार पावसाचा इशारा; 'यलो अलर्ट' जारी

Pramod Yadav

Goa Weather Update

पणजी: विश्रांतीनंतर गेल्या आठवड्यापासून गोव्यात मान्सून सक्रिय झाला आहे. आठवड्याचे शेवटचे दोन दिवस पावसाने राज्याला चांगलेच झोडपून काढले. राज्यातील नद्या तुडूंब झाल्या असून, अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. राज्यात पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. हवामान खात्याने पाच दिवसांसाठी यलो अर्लट जारी केला असून, मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Goa Weather Forecast

गोवा हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही जिल्ह्यात २६ ते ३० ऑगस्ट या पाच दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाच दिवसांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात ३० ते ४० किमी प्रितीतास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, हा वेग ५० किमी प्रतितास एवढा वाढू शकतो, असेही खात्याने म्हटले आहे.

Goa Weather Today

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील एक ते दोन तासांत राज्यातील पेडणे, धारबांदोडा, सांगे, काणकोण तसेच डिचोली, बार्देश आणि सत्तरीत पावसाची शक्यता आहे. या भागात ढगाळ वातावरण राहणार असल्याचे देखील खात्याने म्हटले आहे.

इतर तालुक्यांना देखील पावसाचा फटका बसणार असल्याचे खात्याने म्हटले आहे. याकाळात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा खात्याने दिला आहे. या काळात नैसर्गिक आपत्तीची विचार करता नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या चोवीस तासांत नोंद झालेला पाऊस (Rain Recorded in Goa in Last 24 Hours)

गेल्या चोवीस तासांत गोव्यातील वाळपईत सर्वाधिक १०६.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल फोंड्यात १००.८ मि.मी, ओल्ड गोवा ६८.२ मि.मी, काणकोण ६१.६ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. म्हापशात सर्वात कमी ३२ मि. मी पावसाची नोंद झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT