Goa Rain Updates  Dainik Gomantak
गोवा

Rain In Goa: गोव्यात 'मान्सून रिटर्न्स'; राज्यात कुठे, काय परिस्थिती? वाचा एका क्लिकवर

Goa Rain Updates: विश्रंतीननंतर राज्यात पुन्हा पाऊस. अनेक ठिकाणी पडझड आणि नुकसान

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Weather Updates

Rain In Goa Today: जून-जुलै पासून गोव्यात सुरु झालेला पाऊस अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. मागच्या काही दिवसांत पावसाने थोडासा दम धरला असल्याने कदाचित पावसाळा संपला म्हणत स्थानिकांनी सुस्कारा घेतला होता मात्र एवढ्यात पुन्हा रेड अलर्टसह पाऊस सुरु झाला आहे.

साधरणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत गोव्यात पावसाच्या सरी कमी होतात पण यावर्षी मात्र वाढत चालेल्या या पावसामुळे स्थानिक चिंतीत आहेत. गोव्यात आज पुन्हा पावसाने जोर धरला असून अनेक ठिकाणी नासधूस झाली आहे. राज्यात कोणत्या ठिकाणी काय चित्र आहे जाणून घेऊया..

Goa Rain Updates

1) काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा तडाखा सुरु झाल्याने काही भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. गेल्या 24 तासांत सरासरी 1.10 इंच पावसाची नोंद झाली.

2) आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.

3) मांद्रे पंचायतीने बांधलेल्या खुल्या गटारात जमीन मालकाने पाईप टाकून वरून माती घातल्याने पावसामुळे माती रस्त्यावर आली आणि यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झालीये.

4) राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पेडणे मासळी मार्केटमध्ये प्रचंड पाणी साचले. स्थानिक मच्छीमारांनी नवीन मासळी मार्केटचे बांधकाम त्वरित करण्याची पालिकेकडे मागणी केली आहे.

5) सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे फोंडा अंतृजनगर कुर्टी येथील संरक्षण भिंत कोसळून हजारोंचे नुकसान झाले.

6) वेर्णे-लोटली लिंक रोडवर दरड कोसळल्यामुळे वाहतूक दुसऱ्या एकेरी मार्गाने वळवण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT