Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: राज्यात तुरळक पावसाच्या सरी, काही भागात झाडे पडण्याच्या घटनांची नोंद

Goa Weather Update: राज्यातील घाटलगतच्या परिसरात दमदार बरसत असलेला पाऊस आता मंदावला असून तुरळ पावसाच्या सरी पडत आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यातील घाटलगतच्या परिसरात दमदार बरसत असलेला पाऊस आता मंदावला असून तुरळ पावसाच्या सरी पडत आहेत. नद्यांची वाढलेली पातळी, पाण्याखाली गेलेले रस्ते आता पूर्ववत झाले आहेत, परंतु राज्यातील काही भागात पडझडीच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत.

गेल्या २४ तासांत राज्यात १.०५ इंच पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत ३८.६९ इंच पाऊस पडला आहे. ३६ टक्के पावसाची तूट कायम आहे. पुढील पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आपत्ती व्यवस्थापनाचा अजब कारभार!

शुक्रवारी वाळपईत सर्वाधिक पाऊस पडला, परंतु आपत्ती व्यवस्थापनाकडून वाळपईतील त्या दिवशीच्या पावसाची नोंदच करण्यात आलेली नाही. गोवा वेधशाळेने आपल्या पावसाच्या तक्त्यात स्पष्ट म्हटले आहे की, राज्य सरकारकडून या पावसाची नोंद आम्हाला दिली नाही.

पडझडीच्या घटना

फर्मागुढी - फोंडा येथे गणपती मंदिराजवळ कोसळले झाड.

साकोर्डा येथील प्राथमिक शाळेशेजारील रस्त्यावर कोसळले झाड.

कालवे हळदोणा येथे वीज वाहिनीवर कोसळले पाम झाड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT