Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

Goa Weather And Heatwave Update: हिट इंडेक्स म्हणजेच जाणवणारे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Weather And Heatwave Update

राज्यात पडलेल्या अवकाळी पावसानंतर काही प्रमाणात तापमानाचा पारा घटला असून राज्यात पुढील सात दिवस कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.

हिट इंडेक्स म्हणजेच जाणवणारे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असण्याची शक्यता असून सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्क्यांदरम्यान राहण्याची शक्यता खात्याने वर्तवली आहे.

एकंदरीत राज्यात या आठवड्यात तापमान सर्वसामान्य राहील. काही प्रमाणात उष्णता जाणवेल. मात्र, उष्णतेची लाट येण्याची शक्यता नसल्याने राज्यासाठी ही दिलासादायक बाब आहे.

शुक्रवारी पणजी येथे कमाल ३३.७ अंश सेल्सिअस, तर किमान २५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच ८१ टक्के कमाल आर्द्रतेची नोंद केली, जी सामान्य आर्द्रतेच्या तुलनेत ४ टक्के अधिक होती.

राज्यात २७ एप्रिल ते २ मे या कालावधीत वातावरण कोरडे राहणार असून पहाटे काही भागांत धुके पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

दरम्यान, आयुक्त कार्यालय, कामगार आणि रोजगार यांनी विभागाकडून उष्णतेच्या लाटेची तयारी आणि शमन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

गोवा उष्णतेची लाट कृती आराखडा २०२४ च्या संदर्भात, सर्व खाती, उद्योग, आस्थापनांनी याची खात्री करणे आवश्यक आहे. विशेषतः घराबाहेर काम करणाऱ्यां कामगारांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याची खात्री करावी. दुपारी १२.०० ते ३.०० पर्यंतच्या उष्णतेच्या लाटेचे तास टाळण्यासाठी कामाच्या वेळेत बदल केला पाहिजे आणि यासाठी कामाचे तास पुन्हा तयार करावे.

शिवाय, कामकाजाच्या आवारात तसेच बाहेर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

कोणत्याही कामगार, मजूरांना उष्णतेचा त्रास झाल्यास अशा कामगारांना वैद्यकीय सेवेसाठी हलविणाऱ्या पर्यवेक्षी अधिकाऱ्यांनी वैद्यकीय सुविधा, रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांना अशा मजुरांच्या केस हिस्ट्रीबद्दल माहिती दिली पाहिजे, ज्यामुळे योग्य उपचार दिले जातील, असे आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT