Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोमंतकीयांनो काळजी घ्या! अवकाळी पावसानंतर आता तापमान वाढणार, उष्णतेचा 'यलो अलर्ट' जारी

Goa Weather News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या अवकाळी पावसामुळे अनेक भागांत हवामानात गारवा निर्माण झाला होता.

Sameer Amunekar

पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या अवकाळी पावसामुळे अनेक भागांत हवामानात गारवा निर्माण झाला होता. मात्र, आता हवामानात झपाट्याने बदल होत असून, गोवा राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

गेल्या आठवड्यात राज्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला होता. अनेक भागांत वीजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली होती.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, उद्यापासून चार दिवस तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. चार दिवसाचा यलो अलर्ट देण्यात हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सूर्यप्रकाशात फार वेळ न घालवता सावधगिरी बाळगावी, भरपूर पाणी प्यावे आणि आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, असं आवाहन करण्यात आले आहे.

गोवा राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. अधूनमधून अवकाळी पावसाची हजेरी आणि त्यानंतर तीव्र उष्णतेची लाट अशा परिस्थितीमुळे शेतकरी आणि बागायतदार चिंतेच आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT