Heavy Rain in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: गोमंतकीयांनो काळजी घ्या! मुसळधार पावसाची शक्यता; सावधगिरी बाळगण्याचे निर्देश

Goa Rain Update: गोव्याच्या उत्तर व दक्षिण भागात पुढील तीन ते चार तासांत मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हा इशारा दुपारी २.४५ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

Sameer Panditrao

पणजी : गोव्याच्या उत्तर व दक्षिण भागात पुढील तीन ते चार तासांत मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सोमवारी सकाळी ११.४५ वाजता जारी केलेला हा इशारा दुपारी २.४५ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तर व दक्षिण गोव्यातील बहुतेक ठिकाणी मध्यम (५–१५ मिमी प्रतितास) ते मुसळधार (>१५ मिमी प्रतितास) पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी, अनावश्यक प्रवास टाळावा, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, मुसळधार पावसाचा जोर वाढल्यास शहरांमध्ये पाणी साचणे, खालच्या भागात पूरस्थिती निर्माण होणे, तसेच वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मासेमार व पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हवामान विभागाने गोव्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षित स्थळी थांबावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: तयारीला लागा! पावसाचे सावट दूर होणार, पुढील आठवडा कोरडा; तुलसी विवाहाचा मार्ग मोकळा

Venkateswara Temple Stampede: आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; नऊ भाविकांचा मृत्यू Video

Goa Tourism: गोव्याचं पर्यटन संपलं नाही वाढलं! पर्यटन मंत्र्यांनी थेट आकडेवारीच दिली, सोशल मीडियावरील दावे काढले खोडून

Goa Today's News Live: 19 वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी कांदोळी येथील तरुणाला अटक

Karvi Flowers: श्री गणेशाने हत्तीचे रूप घेतले, मुरुगन आणि वल्लीचे लग्न झाले; गोव्यात फुलणाऱ्या 'कारवी'चे महत्व

SCROLL FOR NEXT