Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Goa Water Supply: ४० टक्के ‘पाणी’ कुठे मुरते, ते शोधणार! फळदेसाईंचे प्रतिपादन; नव्याने जलवाहिन्या घालण्यात येणार

Subhash Phaldesai: मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून परतलेल्या फळदेसाई यांनी सांगितले की, जलस्रोत खात्याकडून पाणी येणार आहे आणि आम्ही प्रक्रिया करून ते लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात पिण्याचे पाणी पुरवठा करणारी यंत्रणा अनेक ठिकाणी जुनी झाली आहे. नव्याने जलवाहिन्या घालाव्या लागणार आहेत, परंतु सध्या प्रकल्पावरून जाणारे ४० टक्के पाणी नक्की कुठे मुरतेय, हे पहावे लागणार आहे. गळतीमुळे एवढे पाणी जमिनीत मुरतेय का? की आणखी त्याला काही कारणे आहेत, याचा शोध घ्यावा लागणार असल्याचे पिण्याचे पाणी खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या महालक्ष्मी बंगल्यावरील भेटीवरून परतलेल्या फळदेसाई यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, जलस्रोत खात्याकडून पाणी येणार आहे आणि आम्ही त्यावर प्रक्रिया करून ते लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. पिण्याचे पाणी खात्याचा जलस्रोत खात्याशीच संबंध येणार आहे. सार्वजनिक बांधकाम व पिण्याचे पाणी ही खाती आता पूर्णतः वेगळी झाली आहेत. ४० टक्के पाणी जे नक्की कुठे जात आहे, त्यामुळे खात्याचा महसूल बुडत आहे.

फळदेसाई यांनी नव्याने तयार झालेल्या स्वतंत्र खात्याचा पदभार स्वीकारला असल्याने त्यांना या खात्यात अनेक कामे करणे शक्य आहे, त्याशिवाय केंद्र सरकारची ‘हर घर जल’ही योजना शंभर टक्के यशस्वी करून दाखवणेही शक्य आहे. सध्या फळदेसाई यांनी पिण्याचे पाणी खात्यामार्फेत पुरवठा यंत्रणेचा अभ्यास सुरू केला आहे. त्यातून पहिल्या टप्प्यात पाणी गळतीचा विषय समोर आल्याचे दिसते.

जलवाहिन्या खराब!

गळतीमुळे ४० पाण्याचा अपव्यय होत असावा, असे सांगून फळदेसाई म्हणाले, जलवाहिन्या खराब झालेल्या आहेत, त्याशिवाय इतर यंत्रणाही नादुरुस्त असू शकतात. ४० टक्के पाण्याचा अपव्यय होत असेल तर त्यातून नक्की किती महसूल बुडत आहे, हे अजून तपासले नाही, असे फळदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 Sutak Time: वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 7 सप्टेंबरला; जाणून घ्या ग्रहण आणि सूतक काळाची वेळ व नियम

Maratha Reservation: सरकार एक तासांत GR काढणार; जरांगेच्या उपोषणाला मोठे यश! हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी होणार

Horoscope Chanda Grahan: मेष, वृषभ , कन्या राशींसाठी 'चंद्र ग्रहण' लाभदायी; आर्थिक स्थैर्य लाभणार, 'या' राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी

Rashid Khan: करामती राशिदचा मोठा 'कारनामा'! अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा आशियाई कर्णधार; नेतृत्वासह गोलंदाजीतही चमकला

Landslide: 'या' देशात पावसाचा हाहाकार! भूस्खलनात संपूर्ण गाव जमीनदोस्त; 1000 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT