Water Shortage Dainik Gomantak
गोवा

Goa Water Shortage: गृहिणींचे हाल संपणार कधी? उन्हाळ्याची चाहूल लागताच हरमलमध्ये 'जल संकट'

Goa Water Shortage: हरमल खालचावाडा भागांत पाणी टंचाई

Ganeshprasad Gogate

Goa Water Shortage: हरमल येथील पंचायत क्षेत्रातील खालचावाडा भागांत पाणी टंचाई ने कहर केला असून, दरमजल करून पाणी भरावे लागत असल्याने गृहिणीत नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान निवडणुका जवळ ठेपल्याने सरकारने दुर्लक्ष करू नये,असे काहीं गृहिणीने नाराजीच्या सुरात व्यक्त केले. गेले आठ दिवस ह्या खालचावाडा भागांत पाणी पुरवठा निकामी ठरला आहे.

भाजपने 'हर घर जल' सारख्या आकर्षक घोषणा करून जनतेला उल्लू बनवले,प्रत्यक्षात पाणी पुरवठा करणारी यंत्रणा कुचकामी असून, नळ जोडणी असूनही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने संताप आहे.

शिवाय लोकसभा निवडणुका जवळ असल्याने दुर्लक्ष न करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ह्या भागातील काही घरे किंचित उंचावर तर काही घरे बरीच आतमध्ये आहेत. त्यामुळे कमी दाबाच्या वेळी पाणी अंतर्गत मार्गात वेळ लागतो. त्यामुळे पाणी टंचाई जाणवत असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

टँकरद्वारे पाणीपुरवठा करा-

गेले कित्येक दिवस विशेषत खालचावाडा भागांत अत्यल्प पाणी पुरवठा होत आहे.ह्यापूर्वी ग्रामस्थांच्या विनंतीवरून टँकरने पाणी पुरवठा केला जायचा.

मात्र सद्या एन मार्च महिना चालू असून, एप्रिल व पुढील महिन्यात पाण्यासाठी वणवण भटकण्याची पाळी न येवो,असे काहींनी सांगितले.

किमान येत्या पावसाळ्यापर्यंत प्रमुख रस्त्याच्या अंतर्गत रस्ता मार्गातील घराना टंचाई जाणवत असल्याचे समजते. सध्याच्या परिस्थितीत टँकरद्वारे पाणीपुरवठा हा पर्याय असून,खात्याने तजवीज करावी अशी मागणी होत आहे.

तरी मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी खात्याच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT