Goa Water Connection Dainik Gomantak
गोवा

Goa Water Issue: गोव्याच्या उत्तर आणि दक्षिण भागात पाणी प्रश्न कायम; उतोर्डा- शापोरात पाण्याचे दुर्भिक्ष

Goa Water Issue: हणजुण- वागातोर- शापोरा या पर्यटन क्षेत्रातही संकट

Ganeshprasad Gogate

Goa Water Issue: मडगाव- उतोर्डा येथील प्रभाग 9 मधील लोकांनी दहा वर्षांपूर्वीच नळाचे कनेक्‍शन घेतले आहे. मात्र या भागात पाण्‍याचा प्रेशर कमी असल्‍यामुळे लोकांना दिवसा दोन तासही मिळणे कठीण झाले आहे.

प्रभाग 9 च्‍या पंचसदस्‍य आणि उतोर्डाच्‍या माजी सरपंच शार्लेट फर्नांडिस यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले की, आमच्‍या प्रभागात एका रस्‍त्‍याने नागरिकांमध्‍ये विभागणी केली असून ज्‍या भागात नवीन निवासी प्रक़ल्‍प आले आहेत तिथे पाण्‍याची नवीन पाईप लाईन टाकल्‍याने त्‍या बाजूंच्‍या घरांना संपूर्ण दिवस 24 तास पाणी उपलब्‍ध असते.

तर दुसर्‍या बाजूला जुनी पाईप लाईन असल्‍याने त्‍या पाण्‍याचा प्रेशर एवढा कमी आहे की दर दिवशी दोन तास पाणी मिळणेही अशक्‍य बनले असल्याचे त्यांनी सांगितले.

तर उत्तर गोव्यातील आंसगांव पंचायत क्षेत्रातील आंसगांव-बादें तसेच हणजुण क्षेत्रातील वागातोर -शापोरा येथील परिसर पर्यटन क्षेत्रात पाणी प्रश्न दिवसेंदिवस ज्वलंत होत चाललाय. काही दिवसांपूर्वी म्हापशाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर येथील स्थानिकांनी धडक देत पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती.

दरम्यान, शिवोलीच्या विद्यमान आमदार दिलायला लोबो यांनी येथील परिस्थितीचा आढावा घेत सोनारखेड- आंसगांव पठारावर 6.5एम. एलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत नुकतीच पायाभरणी केली आहे.

येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत हा प्रकल्प कार्यान्वित होताच याभागातील पिण्याच्या पाण्याची समस्यां कायमची मिटणार असल्याचे आश्वासन लोकांना दिले आहे.

केंद्र सरकारच्‍या ‘हर घर नल’ द्वारे प्रधानमंत्री नरेंद्र माेदी यांनी सर्व घरांना पिण्‍याच्‍या पाण्‍याची गॅरंटी दिली असली तरी दरवर्षी गोवा राज्य सरकारला लाखों रुपयांचा पर्यटन कर देणाऱ्या उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या काही भागातील लोकांना तसेच व्यवसायिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सरकारवर नव्हे तर पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खाजगी टँकरवर अवलंबून राहावे लागते ही येथील सध्याची कटु परिस्थिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT