Goa Crime Case: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी कुख्यात गुन्हेगार सागर शिरोडकर अटकेत

Goa Crime Case: सागर याच्यावर विविध पोलीस स्टेशनवर 18 फौजदारी गुन्ह्यांमध्ये समावेश असल्ल्याची नोंद आहे.
Goa Crime Case
Goa Crime CaseDainik Gomantak

Goa Crime Case: उदय चोडणकर यांना 12 मार्च रोजी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आरोपी सागर शिरोडकर (रा. थिवी) याच्यावर कोळवाळ पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

सागर याला उत्तर गोव्यातून तडीपारचे आदेश उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले होते. या आदेशाचे उल्लंघन करत सागर याने पुन्हा हे कृत्य केलंय.

सागर याच्यावर विविध पोलीस स्टेशनवर 18 फौजदारी गुन्ह्यांमध्ये समावेश असल्ल्याची नोंद आहे. चोडणकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सागर शिरोडकरला पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेतलंय.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार उदय चोडणकर (वय 53 वर्ष रा.1251, सोनीवाडा, थिवी बार्देश) यांना सदर आरोपी सागर शिरोडकर (वय 36 वर्ष) याने चोडणकर यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत त्याच्या उजव्या पायावर आणि तोंडावर लाकडी दांडयाने वार करत जबर जखमी केले.

तसेच जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पलायन केले. मात्र कोलवाळ पोलिसांच्या टीमने त्याला आज 14 मार्च रोजी राहत्या घरातून पकडत स्टेशनमध्ये IPC कलम 324, 504, 506(ii) अन्वये गुन्हा दाखल केलाय.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असून पीआय विजय राणे, एचसी रामा राऊत, पीसी प्रवीण पाटील, पीसी मंदार कांबळी या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी ही महत्वाची कामगिरी बजावली आहे.

Goa Crime Case
Goa Election: महिला उमेदवाराचा शोध गतीने! भाजपचे स्थानिक नेते व्यस्त

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com