Water Metro Goa Project Dainik Gomantak
गोवा

Water Metro Goa: ‘वॉटर मेट्रो’साठी पुढचे पाऊल! अभ्यास पथकाची 28 ठिकाणी भेट; अहवाल पाठवणार पुढे

Water Metro Project in Goa : केंद्र सरकारच्यावतीने केरळमध्ये वॉटर मेट्रो सुरू करणाऱ्या ‘कोची मेट्रो‘ या कंपनीतर्फे गोव्यात वॉटर मेट्रो सर करण्याचा निर्णय झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील जलमार्गावर केरळ राज्याप्रमाणे वॉटर मेट्रो सुरू करण्यासाठी राज्य सरकारचे नदी परिवहन खाते काम करीत आहे. केंद्र सरकारच्यावतीने केरळमध्ये वॉटर मेट्रो सुरू करणाऱ्या ‘कोची मेट्रो‘ या कंपनीतर्फे गोव्यात वॉटर मेट्रो सरकरण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी कोची मेट्रोच्या अभियंत्यांच्या पाहणीनंतर आता कोची मेट्रो आणि सिस्ट्रा कन्सल्टन्सीच्या पथकाने अभ्यास सुरू केला आहे.

केंद्र सरकारच्या भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणातर्फे (आयडब्ल्यूएआय) वॉटर मेट्रो सेवा राज्यात सुरू करण्यात येणार आहे. केरळ राज्याने केंद्र सरकारच्या आयडब्ल्यूएआयच्या सहकार्याने वॉटर मेट्रो सेवा सुरू केली. तेथे ‘कोची मेट्रो‘ (जी भारत सरकारद्वारे नियुक्त केलेली नोडल एजन्सी आहे.) या कंपनीने ही सेवा निर्माण केली.

त्यामुळे या कंपनीच्या माध्यमातून गोव्यातही ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी ही सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ‘कोची मेट्रो‘ने पुढाकार घेत ही सेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक बाबी तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार कोची मेट्रो आणि सिस्ट्रा कन्सल्टन्सीच्या पथकाने राज्यातील २८ ठिकाणी म्हणजेच जलमार्गाच्या बाजूच्या स्थळांना भेटी दिल्या, शिवाय त्या-त्या गावातील ग्रामस्थांची मतेही जाणून घेतली. हा जलवाहतूक सुरू करण्यामागील अभ्यासाचा एक भाग आहे.

अभ्यास पथकाची २८ ठिकाणी भेट

अभ्यास पथकामध्ये ग्लिस्टेन वर्गीस, योगेश आर., प्राजक्ता पांडे यांचा समावेश आहे. या पथकाने राज्यातील २८ ठिकाणी वाहतूक अभ्यास, घरोघरी मते जाणून घेतली. जल वाहतुकीची व्यवहार्यता तपासणे हा सुद्धा या अभ्यासाचाच एक भाग असल्याचे सांगण्यात येते. हा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर, कोची मेट्रो आपला अभ्यासलेला अहवाल आयडब्ल्यूएआय आणि राज्य सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवणार असल्याची माहिती देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT