Goa Water Metro Project Dainik Gomantak
गोवा

Goa Water Metro Project: गोव्यात 'वॉटर मेट्रो'चे वारे! पर्यटन आणि स्थानिक वाहतुकीसाठी ठरणार गेम चेंजर; कोची मेट्रोच्या टीमचे मुख्यमंत्र्यांसमोर प्रेझेंटेशन

CM Pramod Sawant Water Metro Presentation: कोची मेट्रोच्या वतीने प्रस्तावित केलेल्या नऊ मार्गांवर ही सेवा सुरू होऊ शकते. या मेट्रो सेवा प्रकल्पाविषयीचे सादरीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर करण्यात आले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: केरळमधील कोची मेट्रोच्या धर्तीवर गोव्यातील अंतर्गत जलमार्गांवर ‘वॉटर मेट्रो’ सुरू करण्यासाठी मागील वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहेत. कोची मेट्रोच्या वतीने प्रस्तावित केलेल्या नऊ मार्गांवर ही सेवा सुरू होऊ शकते. या मेट्रो सेवा प्रकल्पाविषयीचे सादरीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी हे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी कोची मेट्रोच्या (Metro) पथकासमवेत नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, संचालक विक्रमसिंह राजे भोसले, कोची मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक लोकनाथ मेहरा यांच्यासह तेथील अधिकारी उपस्थित होते. यावेळी मेहरा म्हणाले, की येथील जलमार्गांची कोचीपेक्षा चांगली स्थिती आहे. कोची मेट्रोचे अभियंते म्हणाले, की देशातील ११ राज्यांमध्ये व दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये वॉटर मेट्रोचा प्रकल्प होणार आहे.

दररोज १ लाख लोकांना लाभ

सध्याच्या जलमार्गांवरून ४५ हजार लोक दररोज प्रवास करतात. मात्र, वॉटर मेट्रोमुळे एक लाख लोक दिवसाकाठी प्रवास करू शकतील. शिवाय पर्यटकांनाही ही सेवा आकर्षित करू शकते. कोची मेट्रोप्रमाणे याचीही बांधणी असेल. मुख्यमंत्र्यांना हा प्रकल्प पसंद पडला असून त्यांनी हा प्रस्ताव केंद्राकडे सादर करावा, असे मंत्री फळदेसाई यांनी सूचित केले.

वॉटर मेट्रोचे राज्यातील प्रस्तावित मार्ग असे...

पणजी-बिठ्ठोण-चोडण

बेट-अंबोई-वाशी-नार्वे

बेती-पणजी-रायबंदर-दिवाडी

बेट-सापेंद्र-जुने गोवे

जुने गोवे-पियादाद-सां माथियास (दिवाडी) नार्वे-सारमानस-टोंक

वास्को-कुठ्ठाळी

कुठ्ठाळी-मडकई-रासई-आडपई-दुर्भाट

जुने गोवे-ताल्तो-गवंडाळी-कुंभारजुवे

पणजी-दोनापावला व्ह्यू पॉईंट-वास्को

पणजी-रेईश-मागूस-फोर्ट,

आग्वाद-बागा खाडी-शापोरा व्ह्यू पॉईंट

शापोरा किल्ला-केरी-तेरेखोल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: कॅन्सरवर मात करुन 10 वर्षांनंतर संघात परतला, पण 33 चेंडू खेळूनही खातं उघडता आलं नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Jeffrey Archer: संसद ते तुरुंग अन् तिथून 'बेस्टसेलर' लेखकापर्यंत! जेफ्री आर्चर यांचा थक्क करणारा प्रवास

Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या ‘नावी’ पिल्लई यांना मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; न्यायासाठीचा संघर्ष ठरला यशस्वी

Arjun Tendulkar Injury: अर्जुन तेंडुलकरला दुखापतीचा फटका; गोव्याच्या रणजी सलामीच्या सामन्याला मुकणार!

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

SCROLL FOR NEXT