No Water Canva
गोवा

Goa Water Crisis: गोवावासीयांसमोर भीषण पाणीसंकट! राज्यात 62 MLD पाण्याची तूट; तक्रारींचा वाढला ओघ

Water Shortage Problem in Goa: सुमारे १५ लाख लोकसंख्या आणि ७० लाख पर्यटकांचा ताण, एवढा भार असलेल्या राज्यात आजही रोज ६२ एमएलडी पाण्याची तूट आहे.

Sameer Panditrao

पणजी: हर घर जल ही सरकारी योजना असली तरी प्रत्यक्षात जनतेपर्यंत पेयजल पोचत नाही अशी वस्तुस्थिती आहे. पाणीपुरवठा होत नसल्याच्या तब्बल ७०० तक्रारी सरकारला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ॲपवर प्राप्त झाल्या आहेत. यावरून पाणीटंचाई किती भीषण आहे हे लक्षात येते.

सुमारे १५ लाख लोकसंख्या आणि ७० लाख पर्यटकांचा ताण, एवढा भार असलेल्या राज्यात आजही रोज ६२ एमएलडी पाण्याची तूट आहे. यासंदर्भात पाणी नसल्याच्या राज्यभरातून ३३८ तक्रारी आल्या असून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अ‍ॅपवर ७०० तक्रारींची नोंद आहेत.

पाणी ही मूलभूत गरज आहे आणि ती पुरवणे सरकार शक्य होत नसेल तर विकास फक्त भाषणातच उरतो असे म्हणण्याची वेळ गोमंतकीय जनतेवर आली आहे. सरकार सातत्याने ‘सुशासन’, ‘विकसित गोवा’ अशा घोषणा देत असताना मोरजी, पेडणे, शिवोली, बांबोळी आणि गोव्याच्या अनेक भागांत दररोज पाणी तुटवडा जाणवत आहे.

मोरजीतील गावडेवाडा, विठ्ठलदासवाडा आणि तेमवाडा या भागात २०१६ पासून आजपर्यंत पाण्याचा पुरवठा झालेलाच नाही अशी भयावह माहिती समोर आली आहे. काही चार तास कमी दाबाने पाणी येते, तेही दर दोन दिवसांनी. वेळ न ठरता कधीही पाणी सोडले जाते म्हणून लोकांना मध्यरात्रीपर्यंत जागे रहावे लागते.

पाण्याच्या कमतरतेची समस्या केवळ निसर्गजन्य नसून ती शासनाच्या व्यवस्थापनाच्या अपयशामुळे निर्माण झालेली आहे. ३० वर्षांपूर्वी घातली जलवाहिनी आजही बदललेली नाही. गळती लागलेल्या टाक्यांच्या दुरुस्तीला उशीर होतो आणि ठेकेदारांच्या मनमानी कारभाराला अधिकारी कधीच आळा घालत नाहीत. यामुळे लोकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याचे समजते.

सरकारने या मुद्यांकडे लक्ष द्यावे

जुन्या पाईपलाइनचे नकाशे तयार करणे

प्रत्येक गावात ‘जल समित्या’ प्रभावी करणे

नागरिकांसाठी जल पोर्टल पारदर्शक ठेवणे

अधिक जलशुद्धीकरण प्रकल्प वेळेत पूर्ण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT