
पणजी: जनतेने १६ हजार लिटर मोफत पेजयल योजनेचा गैरवापर केला. त्यांनी मोफत पाण्यासाठी नळजोड असलेल्या घरात दुसरा नळ जोड घेतला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच ही माहिती आगशी येथील एका कार्यक्रमात उघड केली.
सरकारने ही लोकप्रिय योजना अचानक का बंद केली याविषयी चर्चा आहे. सरकारने याचे कारण जाहीरपणे सांगितले नव्हते. ही योजना बंद केली जात असल्याचेही जाहीर करण्यात आले नव्हते. सार्वजनिक बांधकाम खात्याने जारी केलेल्या पाणी दरवाढीच्या अधिसुचनेनंतर ही योजना गुंडाळली गेल्याचे लक्षात आले होते. त्याबाबत सरकारतर्फे मुख्यमंत्र्यांनी प्रथमच भाष्य केले.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकार पाणीपुरवठ्यातील महसुली नुकसान सध्याच्या ४० टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या उद्दिष्टाने कार्यरत आहे. प्रत्येक घराला दरमहा १६,००० लिटर मोफत पाणी देणारी योजना काही नागरिकांच्या गैरवर्तनामुळे बंद करण्यात आली.
अनेक जणांनी एकाच घरात वेगवेगळ्या नावाने एकाधिक मीटर काढून ही सवलत अनेक वेळा घेतली. त्यामुळे या योजनेचा हेतूच चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आला. सरकार दर घनमीटर पिण्याच्या पाण्यावर २० रुपये इतका खर्च करते. मात्र, नागरिकांकडून केवळ ३.५ ते ४ रुपये इतकेच शुल्क आकारले जाते. उर्वरित खर्च सरकार स्वतः उचलते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.