Goa Voter List Dainik Gomantak
गोवा

Goa Voter List: मतदार कपातीत गोवा सातव्या क्रमांकावर, 10.02 टक्‍के मतदारांना वगळले

10 percent reduction in Goa voter list: देशातील मतदारयादी सुधारणा मोहिमेचा भाग म्हणून राबवण्यात आलेल्या विशेष सखोल सुधारणा (एसआयआर) प्रक्रियेचा दुसरा टप्पा ज्या १२ राज्यांमध्ये पार पडला.

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Voter List Reduction : देशातील मतदारयादी सुधारणा मोहिमेचा भाग म्हणून राबवण्यात आलेल्या विशेष सखोल सुधारणा (एसआयआर) प्रक्रियेचा दुसरा टप्पा ज्या १२ राज्यांमध्ये पार पडला, त्यात गोव्‍यातील १०.०२ टक्के मतदारांची कपात झाली. या यादीत गोव्‍याचा बारा राज्‍यांमध्‍ये सातवा क्रमांक लागला आहे.

मतदारयादीची अचूकता सुधारण्यासाठी आणि अपात्र नोंदी वगळण्यासाठी निवडणूक आयोगाने संपूर्ण देशभरात एसआयआर प्रक्रिया राबवण्‍याचा निर्णय घेतला.

या मोहिमेअंतर्गत १२ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातून ५.२ कोटींहून अधिक जणांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली. या राज्यांमध्ये अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये नावे वगळण्याचे प्रमाण सर्वाधिक (१६.६ टक्के) नोंदवले गेले.

१०,५७,५६६ मतदार

गोव्‍या‍तील एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणीकृत मतदारांची एकूण संख्या १० लाख ५७ हजार ५६६ इतकी झाली आहे. यापूर्वीच्या यादीत ही संख्या ११ लाख ८५ हजार ०३४ इतकी होती. राज्यात एकूण १ लाख ३९ हजार ६३४ नावे वगळण्यात आल्याची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT