Warakari while walking on the road, at Goa. on Monday, 19 July 2021.  Dainik Gomantak
गोवा

Goa: आषाढीच्या पूर्वसंध्येला डिचोलीत दुमदुमला विठूनामाचा गजर

दैनिक गोमन्तक

डिचोली: मुखी विठूनामाचा जयघोष आणि मध्येच बरसणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर झेलत विठ्ठलभक्त वारकऱ्यांनी (Varkari) आषाढी एकादशीच्या (Aashadhi Ekadashi) पूर्वदिनी सोमवारी भक्तीमय वातावरणात आमोणेहून (Aamona) डिचोलीमार्गे (via Bocholim) हळदणवाडी - मयेपर्यंत (Mayem) पायी वारी केली. या वारीसाठी सजविलेल्या वाहनात श्री विठ्ठल-रखुमाईची मूर्तीही (Statue of Vitthal - Rakhumai) स्थानापन्न करण्यात आली होती. वारी पायी मार्गक्रमण करताना वाटेत सर्वत्र भक्तिमय माहोल पसरतानाच विठूनामाचा गजर दुमदुमत होता. कोविड महामारीमुळे यंदाही पंढरपूरच्या पायी वाऱ्या रद्द झाल्याने आमोणे येथील ओम नमो ज्ञानेश्वर माऊली (Sant Dnyaneshwara) वारकरी मंडळाने या एक दिवसीय 'पायी वारी'चे आयोजन केले होते. पायी वारी करीत पंढरपूरला जाण्याचा योग न मिळालेले श्री विठ्ठलाचे निस्सीम भक्त या पायी वारीत उत्साहाने सहभागी झाले होते.

घाडीवाडा-आमोणे येथील श्री रामपुरुष मंदिरातून देवदेवतांचे दर्शन घेवून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या पायी वारीला सुरवात झाली. आमोणेहून साखळी, कारापूर, सर्वणमार्गे वारी रात्री डिचोलीत पोचली. नंतर तेथून मयेमार्गे हळदणवाडी-मये येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरापर्यंत गेली. या पायी वारीत आमोणेसह, माशेल, कारापूर, सर्वण आदी परिसरातील मिळून शंभरहून अधिक वारकरी सहभागी झाले होते. वाटेत विविध ठिकाणी नागरिक भक्तांकडून पायीवारीची ओवाळणी तसेच वारीसमवेत असलेल्या श्री विठ्ठल-रखुमाई देवतांच्या मूर्तींचे मनोभावे दर्शन घेण्यात आले. पायी वारीत सहभागी वारकऱ्यांनी वाटेत मिळणाऱ्या मंदिरांना भेट देवून देवतांचे आशीर्वाद घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT