Goa Mangroves Illegal Construction Dainik Gomantak
गोवा

Goa Mangroves: खारफुटी क्षेत्र बचावासाठी सरकारचा मोठा निर्णय; अनधिकृत बांधकाम, अतिक्रमणाबाबत मंत्री राणेंनी दिला स्पष्ट इशारा

Vishwajit Rane On Mangroves Illegal Construction: राज्यातील किनारपट्टी आणि पर्यावरणीय समतोल राखण्यात मोलाचा वाटा असलेल्या खारफुटी परिसंस्थेच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील किनारपट्टी आणि पर्यावरणीय समतोल राखण्यात मोलाचा वाटा असलेल्या खारफुटी परिसंस्थेच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वनमंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले की, राज्यभरातील सुमारे ३,५०० सर्वेक्षण क्रमांकांची ओळख पटवून, त्या सर्व ठिकाणांना संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे. त्‍यानंतर या खारफुटी क्षेत्रात बांधकामांना परवानगी मिळणार नाही, असा स्‍पष्‍ट इशारा मंत्री राणे यांनी दिला.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाला तपशीलवार सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वेक्षणानंतर संपूर्ण अहवाल सरकारपुढे सादर करण्यात येणार असून, खारफुटी असलेल्या कोणत्याही क्षेत्रावर अनधिकृत बांधकाम अथवा अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही मंत्री राणे यांनी दिला.

लोक खारफुटीची झाडे तोडतात, जागा मातीच्या भरावाद्वारे भरून टाकतात आणि मग सरकारकडून परवानगी घेतात. हे असे प्रकार रोखण्यासाठीच आम्ही ही कारवाई करत आहोत, असेही वनमंत्री राणे यांनी ठणकावून सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली कठोर कारवाई

सरकारकडून होत असलेल्या या सर्वेक्षणामुळे राज्यात खारफुटी अस्तित्वात असलेल्या प्रत्येक भागाची अचूक माहिती उपलब्ध होणार असून, भविष्यात कोणताही विकास प्रकल्प त्या ठिकाणी परवानगीविना राबवता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण आणि पर्यावरणविरोधी कृतींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही राणे यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT