Goa Vintage Car Rally | Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

Goa Vintage Car Rally: गोवा विंटेज ॲण्ड क्लासिक व्हेईकल्स क्लबतर्फे चिखलीवासीयांनी अनुभवली 'विंटेज कार रॅली'

Goa Vintage Car Rally: मंत्री माविन गुदिन्हो यांनी बावटा दाखवल्यानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

Vasco: विंटेज कारची योग्य देखभाल करणे, त्यांचा सांभाळ करणे अतिशय कठीण काम असून जे लोक विंटेज कारची योग्यरित्या देखभाल करतात, त्यांच्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम प्रोत्साहन देणारे ठरतात, असे प्रतिपादन वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.

गोवा वाहतूक संचालनालयाने गोवा विंटेज ॲण्ड क्लासिक व्हेईकल्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने चिखली येथे गोवा लिबरेशन ड्राईव्ह रॅलीचे आयोजन केले होते. मंत्री माविन गुदिन्हो यांनी बावटा दाखवल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत जुन्या काळातील अनेक विंटेज कार सहभागी झाल्या होत्या.

आपला इतिहास काय आहे, याची माहिती युवा पिढीला असायला हवी. जुन्या काळात गोव्यात कुठल्या प्रकारची वाहने होती, त्याची माहिती आजच्या पिढीला असावी, या हेतूने चिखली येथे आयोजिलेल्या गोवा लिबरेशन ड्राईव्हमध्ये ‘विंटेज कार रॅली’ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, ही आनंदाची गोष्ट आहे, असे गुदिन्हो म्हणाले. यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर आणि मान्यवर उपस्थित होते.

काय आहे डीड ऑफ सरेंडर?

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले की, पोर्तुगिजांनी गोवा राज्य सोडण्यापूर्वी मुरगाव तालुक्यात अर्थात वास्कोत आत्मसमर्पणाच्या कागदपत्रांवर (डीड ऑफ सरेंडर) सही केली होती, याची माहिती युवा पिढीला असणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: भारताने पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले, पण अचानक संघर्षविराम का केला? 'पाकव्याप्त काश्मीर' ताब्यात का घेतला नाही?

Goa Third District: 'तिसऱ्या जिल्ह्या'त फोंड्याचा समावेश का नाही?

Street Dog: भटक्या कुत्र्यांना अन्न वाढणाऱ्या महिलेला दम, उपद्रव वाढल्याने नागरिक संतप्त

Goa Politics: खरी कुजबुज; युरींना मिळणार मर्जीतले पोलिस

Goa Assembly Live: धिरयो कायदेशीर करा; आमदारांची मागणी

SCROLL FOR NEXT