Goa veterinary college June deadline: गोव्यातील शिक्षण आणि कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या 'पशुवैद्यकीय महाविद्यालया'चे कामकाज येत्या जून महिन्यापर्यंत कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्या आहेत. पणजी येथे आयोजित एका उच्चस्तरीय आढावा बैठकीत मंगळवारी (दि.६) मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांच्या सचिवांना आणि प्रमुखांना कामात गती आणण्याचे आदेश दिले.
बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महाविद्यालयाच्या कॅम्पसचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर दिला. या महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या अद्ययावत उपकरणांची खरेदी, प्रयोगशाळांची स्थापना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'पशुवैद्यकीय रुग्णालय आणि क्लिनिकल कॉम्प्लेक्स' उभारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
संलग्नता: गोवा विद्यापीठाशी (Goa University) महाविद्यालयाची संलग्नता मिळवण्याच्या प्रक्रियेला वेग देणे.
पदनिर्मिती: प्राध्यापक (Teaching Staff) आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या (Non-teaching staff) पदांची तातडीने निर्मिती करणे.
प्रवेश प्रक्रिया: जूनच्या सत्रापासून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यादृष्टीने वेळापत्रक तयार करणे.
मत्स्यव्यवसाय महाविद्यालय: जमीन आणि संपर्क सुविधेवर चर्चा.
गोव्याच्या किनारपट्टीच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या असलेल्या 'मत्स्यव्यवसाय महाविद्यालया'च्या (Fisheries College) प्रस्तावावरही बैठकीत गांभीर्याने विचार करण्यात आला. या महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी आवश्यक असणारी वाहतूक कनेक्टिव्हिटी यावर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले की, या क्षेत्रात पात्र गोमंतकीय तरुणांची उपलब्धता वाढवणे आवश्यक आहे. मत्स्यव्यवसाय महाविद्यालयाची स्थापना झाल्यास स्थानिक तरुणांना व्यावसायिक शिक्षण मिळून या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि भविष्यातील योजनांचा आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.