Goa News | Subhash Velingkar Dainik Gomantak
गोवा

Goa News: सुभाष वेलिंगकर म्‍हणजे एक योद्धा शिक्षक- दिलीप बेतकेकर

Goa News: सुभाष वेलिंगकर हे समाजासाठी राज्यातील अनेक आंदोलनात आघाडीवर राहिले.

दैनिक गोमन्तक

Goa News: समाजात अनेक माणेस जन्माला येतात. मात्र त्‍यातील मोजकेच लोक समाजहितासाठी कार्य करतात. त्यांना तसे भाग्य लाभते. प्रा. सुभाष वेलिंगकर उंबरठ्यावरील दिवा बनून सर्वांसाठी जगले. त्यांनी अनेक माणसे घडविली. ते केवळ एखाद्या विषयाचे शिक्षकच नव्हते तर ते एक योद्धा शिक्षक होते, असे प्रतिपादन प्रा. दिलीप बेतकेकर यांनी केले.

वेर्णा येथील श्री महालसा नारायणी मंदिर सभागृहात प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या अमृतमहोत्सवी जन्मदिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभात प्रमुख वक्ते म्‍हणून बेतकेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वामी दुर्गानंद गिरी महाराज, मठाधीश मुकुंदराज मडगावकर उपस्थित होते.

तसेच, यावेळी प्रा. माधव कामत, कृष्णराज सुकेरकर, रामदास सराफ, अनिल खंवटे, कमलाक्ष नाईक आदी मान्यवरांसह उपस्थितांमध्ये माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप उपस्‍थित होते. प्रा. माधव कामत यांनीही विचार मांडले.

अजूनही दबावतंत्राचा वापर: वेलिंगकर

  • देशहित सर्वात आधी असा विचार करण्यात गोमंतकीय आता पुढे आहेत. तो मग हिंदू असो की ख्रिश्‍चन. डॉ. टी. बी. कुन्हा यांच्‍यासारख्या प्रखर राष्ट्रभक्तांनी ख्रिश्‍‍चनांनाच नव्हे तर संपूर्ण गोवेकरांना राष्ट्रवाद शिकवला, असे प्रा. सुभाष वेलिंगकर म्‍हणाले.

  • दुर्देवाने हा वारसा पुढे नेणाऱ्यांची आज गळचेपी केली जाते. राष्ट्रप्रेम ही फक्त आपलीच मक्तेदारी असल्याचे काहींना वाटते. ती फक्त त्यांनीच व्यक्त करायला व शिकवायला हवी, असेही त्यांना वाटते. इतरांनी केल्यास गुन्हा. हा कार्यक्रम होऊ नये म्हणून इतर कार्यक्रम त्याच वेळी ठेवले जातात. दबावतंत्र वापरले जाते, असा आरोपही त्‍यांनी केला.

प्रा. दिलीप बेतकेकर, शिक्षणतज्‍ज्ञ-

प्रा. सुभाष वेलिंगकर हे समाजासाठी कार्यरत राहिले. राज्यातील अनेक आंदोलनात ते आघाडीवर राहिले. त्यांनी सदैव सामाजिक बांधिलकी जपली. आपली गरज शाळेत असल्याचे जाणून त्यांनी आपल्‍या महाविद्यालयीन कारकिर्दीला सोडचिट्ठी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आयुष्य वेचले. संघ हाच त्यांचा श्‍वास होता व आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचं आमिष; मांगोरहिल येथील महिलेला 12.86 लाखांचा गंडा, महाराष्ट्रातील 4 जणांवर गुन्हा दाखल

Goa Winter Updates: राज्यात थंडीचा कडाका वाढला

Lionel Messi In India: 3 दिवस, 4 शहरं… मेस्सी भारत दौऱ्यावर! कधी, कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात उपस्थित राहणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Goa ZP Election 2025: भाजप 40, मगोच्या वाट्याला 3 जागा तर सात जागांवर अपक्ष उमेदवार; सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला फिक्स

Watch Video: संघ हरला म्हणून राग आला, चाहत्यांनी स्टेडियमच पेटवलं; क्षणात सगळं जळून खाक, आग लावणारे 15 वर्षांखालील मुलं

SCROLL FOR NEXT