Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पर्यटकांना हेरून मौल्यवान वस्तू चोरायचा, कॅसिनोत जाऊन उधळायचा! हॉटेल चोरी प्रकरणातील कासीमचे कारनामे उघड

Goa Hotels Theft Case: पोलिसानी तपास करून कासीमला गजाआड केले. सध्या तो कोलवा पोलिसांच्या पोलिस कोठडीत आहे. चोरी करण्याची त्याला सवय जडली होती.

Sameer Panditrao

मडगाव: बालपणापासून  लहानसहान चोऱ्या करणारा कासिम फय्याजला  झटपट श्रीमंत व्हायचे होते, त्यातून त्याने तारांकित हॉटेलमध्ये उतरलेल्या पर्यटकांना सावज बनविण्यास सुरुवात केली होती.  त्यांचे मौल्यवान वस्तू  चोरून,  नंतर त्यातून मिळालेली रोकड, तो कॅसिनोवर  उधळीत होता. त्याला जुगाराचे व्यसन होतेच. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने हा मार्ग अवलंबिला होता.

कासिमने एक सोनसाखळी, १ नेकलेस, ४ कर्णफुले, २ अंगठ्या चोरली होती. हेच दागिने त्याने आपला मित्र प्रदीपला देऊन, त्याच्याशी तो खोटे बोलला होता. पोलिसानी शोध घेऊन दागिने जप्त केले होते. पर्यटक राहत असलेल्या रुमाच्या खिडकीचे दार उघडून चोरी करण्यात त्याचा हातखंडा आहे. वार्का येथे त्याने केलेली चोरी सीसीटीव्हीमध्ये बंदिस्त झाली होती, पोलिसानी तपास करून शेवटी कासीमला गजाआड केले. सध्या तो कोलवा पोलिसांच्या पोलिस कोठडीत आहे.

पोलिस  तपासात या बाबी उघड झाल्या आहेत.  चोरी करण्याची त्याला सवय जडली होती. वार्क येथील क्लब महिंद्रा येथे त्याने तब्बल तीन चोरी केल्या आहेत. या हॉटेलात रूममध्ये रहात असलेल्या एका आयएस आय अधिकाऱ्याचे दहा लाखांचे सुवर्णलंकार त्याने पळविले होते.

उडपीचा रहिवाशी!

कासिम  मूळ  उडपी येथील आहे. त्याने आपला मित्र प्रदीपला  आपण आर्थिक विवंचनेत असल्याचे सांगून हे दागिने आपली पत्नी व मुलीचे असल्याचे खोटे सांगून त्याच्याकडून पैसे घेतले होते. प्रदीपने  हे दागिने एका वित्त कंपनीत तारण ठेऊन तेथून कर्ज घेऊन नंतर ती रक्कम त्याला दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT