Goa News Gomantak Digital Team
गोवा

Goa Vehicle Scrapping Policy : जुनी वाहने ‘स्क्रॅप’ला ट्रकमालकांचा विरोध; काय आहे कारण?

वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांनी राज्यात स्क्रॅप योजना जाहीर करणार असल्याचे सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Vehicle Scrapping Policy : केंद्र सरकारने पंधरा वर्षावरील वाहने स्क्रॅप करण्याची योजना जाहीर केली असून याची अंमलबाजवणी गोव्यासारख्या छोट्या राज्यात करू नये, अशी मागणी सावर्डे भागातील ट्रक मालकांनी केली आहे. जर ही योजना गोव्यात लागू केल्यास लोकसभा निवडणुकीत आम्ही सत्ताधारी उमेदवाराला भंगारात काढू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

खाण व्यवसाय कधी सुरू होणार, याकडे आम्ही लक्ष देऊन असताना अचानक वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांनी राज्यात स्क्रॅप योजना जाहीर करणार असल्याचे सांगितले असल्याने ट्रक मालकापुढे पेच निर्माण झाला असल्याचे वल्लभ दळवी यांनी सांगितले.

योजनेचा अभ्यास

सरकारचे धोरण सामान्य लोकांना त्रास देण्याचेच असेल तर ज्याप्रमाणे कर्नाटकात भाजपची गत झाली, तशी या लोकसभा निवडणुकीत होऊ शकते, यासाठी सरकारने या योजनेविषयी गंभीरतेने अभ्यास करावा व स्क्रॅप पोलिसी राज्यात लागू करू नये, अशी मागणी यावेळी ट्रक मालकांनी केली.

पोटावर पाय...

खाण व्यवसाय बंद झाल्याने आमचे ट्रक कित्येक वर्षे बंद होते, याची सरकारला जाणीव आहे का? असा प्रश्न केशव नाईक यांनी उपस्थित केला. राज्य सरकारने खाण ब्लॉकचा लिलाव केला असल्याने ट्रक व्यावसायिक हा व्यवसाय सुरू होणार, या आशेवर जगत होते, पण आता स्क्रॅप पोलिसी जाहीर केल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांच्या पोटावर पाय ठेवण्याचा प्रकार सरकार करीत आहे, असे नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT