Vijai Sardesai : 'भारत जोडो'मध्ये सहभागी झालो तर BJP आणि RG च्या पोटात का दुखले?

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील झाल्यानंतर विजय सरदेसाई यांच्या विरोधात स्थानिक भाजपने प्रचार आघाडी उघडलेली असतानाच विजय सरदेसाई यांनी सरकारवर पलटवार केला.
Vijay Sardesai
Vijay Sardesai Dainik Gomantak
Published on
Updated on

Vijai Sardesai on Bharat Jodo Yatra : मी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील झालो म्हणून भाजप आणि आरजीच्या पोटात का दुखले? असा सवाल करून मी काही एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलो नव्हतो किंवा एनडीएच्या नेत्यांना भेटलो नाही. निवडणुकीत ज्या पक्षांशी आमची युती आहे त्या पक्षाच्या नेत्यांना मी भेटण्यासाठी गेलो होतो. भाजपला घरी बसविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी संघटित युती करण्याची गरज मी पदोपदी व्यक्त केली आहे. आता अशी युती होणार या भीतीने या विरोध करणाऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा तर आला नाही ना? असा सवाल सरदेसाई यांनी केला.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील झाल्यानंतर विजय सरदेसाई यांच्या विरोधात स्थानिक भाजपने प्रचार आघाडी उघडलेली असतानाच विजय सरदेसाई यांनी सरकारवर पलटवार केला. ‘हे सरकार फक्त ‘इव्हेंट’ आयोजन करून त्यावरील कमिशनची मलई खाण्यातच गर्क आहे. कोसळलेल्या प्रशासनाचे त्यांना काहीच पडून गेलेले नाही’, असा आरोप त्यांनी केला आहे. सरकारचे हे गौडबंगाल लवकरच उजेडात आणू, असा इशाराही त्यांनी दिला.

Vijay Sardesai
Margao : मडगाव पालिकेचा धडाका; 52 लाखांची थकबाकी 21 दिवसात वसूल

फातोर्डा येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सरदेसाई यांनी हा हल्लाबोल केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ते इफ्फी महोत्सव या सर्व आयोजनात मंत्र्यांनी कमिशन घेऊन पैसा केला आहे. या सरकारमधील मंत्री इव्हेंट कंपन्यांचे भागीदार बनले आहेत. हे कार्यक्रम राज्याच्या भल्याचे नसून काही मंत्र्यांचे खिसे भरण्यासाठी आहेत. या सर्व कार्यक्रमांची मी माहिती हक्क कायद्याखाली माहिती मागितली आहे. ती हाती आल्यावर या सर्वांना उघडे पाडू, असा इशारा त्यांनी दिला.

सध्या गोव्यात रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याबाबत सरकारला धारेवर धरताना सरदेसाई म्हणाले, जुने गोवे येथील फेस्त दोन दिवसांवर आलेले असताना रस्त्याखालून केबल टाकण्यासाठी पिलार बाजूने रस्ता फोडून ठेवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com