Vegetable Price  Dainik Gomantak
गोवा

Rise In Vegetable Price: फोडणी महागली; मिरची, लसूण, आलेही वधारले

हॉटेलमालक त्रस्त : श्रावण महिन्याच्या तोंडावर गृहिणींचे बजेट कोलमडले; राज्यात आवक घटली

गोमन्तक डिजिटल टीम

Rise In Vegetable Price: घाटमाथ्यावर मॉन्सून लांबल्याने राज्यात होणारी भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. याचा बाजारपेठेतील भाज्यांच्या किमतींवर परिणाम झाला असून आता आले, लसूण आणि हिरव्या मिरच्यांचेही दर वाढले आहेत. परिणामी ऐन श्रावण महिन्यात गृहिणींचे बजेट कोलमडले असून हॉटेल व्यावसायिकही त्रस्त झाले आहेत.

अवकाळी पावसानंतर मॉन्सूनने दिलेल्या हुलकावणीमुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकरी पावसाची वाट पाहात आहेत. पावसाने ओढ दिल्याने त्याचा जबर फटका भाजीपाल्याला बसला असून राज्यातील आवक घटली आहे.

पणजी मार्केटमध्ये टोमॅटोचे दर 120 ते 150 असे आहेत. त्यापाठोपाठ दररोजच्या जेवणात चवीसाठी आवश्यक असलेले आले प्रतिकिलो 400 रुपये झाले आहे.

घाटमाथ्यावर पावसाने हुलकावणी ​दिल्याने शेतकऱ्यांचे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आवश्यक तितक्या प्रमाणात टोमॅटो बाजारात येत नाही. भाजीपाल्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

- मौला देसाई, भाजी विक्रेते.

पालेभाज्याही महागल्या

पावसाचा फटका बसल्यामुळे पालेभा​ज्यांच्या दरांतही​ बरीच वाढ झाली आहे. सध्या खुल्या बाजारात मेथी 30 रुपयांना एक जुडी, तांबडी भाजी 50 रुपयांना तीन जुड्या, पालक 15 रुपयांना एक, मुळा 20 रुपये जुडी, तर कोथिंबीर 40 रुपये या दराने विकली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT