Goa vegetable rates Dainik Gomantak
गोवा

Goa Vegetable Rates: महागाईचा भडका! गोव्यात भाजी, फळांचे दर दुप्पट; काय आहे बाजारभाव? वाचा..

Goa Vegetable Prices: बटाटे ४० रुपये किलो, सफरचंद २५० ते २८० रुपये किलो, नासपती २२५ रुपये किलो, काकडी ६० रुपये किलो, ड्रॅगन फळ १०० ते १५० आकारानुसार एक नग होता.

Sameer Panditrao

पेडणे: येथील आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर दुप्पट ते तिप्पट वाढल्याचे दिसून आले. २० रुपये किलो असलेले टोमॅटो ४० रुपये प्रती किलो विक्री झाले. अशाच प्रकारे अन्य भाजीपाला व फळांचे दर वाढले होते.

वालपापडी १७० रुपये किलो, भेंडी ८० रुपये किलो, हिरवी मिरची ७० रुपये किलो, सिमला मिरची १०० रुपये किलो, कार्ले ८० रुपये किलो, गाजर ७० रुपये किलो, चिटकी मिटकी १२० रुपये किलो, वाली १०० रुपये किलो, दोडगी ७० रुपये किलो आहे.

कोबी २५ रुपये किलो, तोंडली १२० रुपये किलो, मेथी पाला २० रुपये एक जुडी, कोथिंबीर एक जुडी ३५ रुपये, पालक २० रुपये एक जुडी, बीट ६० रुपये किलो, वांगी ८० रुपये किलो, कांदे ३० रुपये किलो, बटाटे ४० रुपये किलो, सफरचंद २५० ते २८० रुपये किलो, नासपती २२५ रुपये किलो, काकडी ६० रुपये किलो, ड्रॅगन फळ १०० ते १५० आकारानुसार एक नग होता.

सतत पडणाऱ्या पावसामुळे भाजीपाला कुजल्याने उत्पन्न घटले आहे, त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. हा भाजीपाला व फळे बेळगाव, कोल्हापूर, निपाणी आदी भागातून आयात केली जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT