Sameer Amunekar
पावसाळा म्हणजे हिरवाईचा सण. याच ऋतूत जंगलं, डोंगरमाथे आणि शेताच्या कडेने उगवणाऱ्या रानभाज्यांना खास महत्त्व असतं. या भाज्या चवीलाही सुरेख आणि आरोग्यासाठी तर अमृतसमान
अळुची भाजी किंवा अळ्याचे वडे हे कोकणातले खास खाद्यपदार्थ. अळुची पाने शरीरातील पचनक्रिया सुरळीत ठेवतात. यात लोह, कॅल्शियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असते.
काळ्या टाकळ्याची भाजी कडवट असली तरी तिचे फायदे अमुल्य आहेत. हि भाजी शरीरातला उष्णता कमी करते आणि रक्तशुद्धी करते. गावाकडील बायका हिला "औषधी भाजी" मानतात.
शेवग्याची पानं आणि फुलं हे दोन्हीही अत्यंत पौष्टिक, औषधी गुणधर्मांनी युक्त आणि पावसाळ्यात खाण्यासाठी उपयुक्त असतात.
टायकाळा ही एक रानभाजी आहे ज्याची पाने थोडी रुंद, हिरवी आणि पातळ असतात. यामध्ये थोडीशी चव अळशी किंवा अळुच्या पानांसारखी असते, पण ही भाजी पचायला खूपच हलकी आणि औषधी गुणांनी युक्त असते.
अळुच्या पानांप्रमाणे टायकाळ्यामध्ये सुईसारखी खरचटपणा निर्माण करणारा कॅल्शियम ऑक्सलेट असू शकतो, त्यामुळे पानं योग्य प्रकारे उकळून आणि चांगली शिजवूनच खावीत.