Goa vegetable rates Dainik Gomantak
गोवा

Goa Vegetable Price: चतुर्थीत दर भडकले! बाजारात भाज्यांना वाढती मागणी; नारळसुद्धा परवडेना

Goa Coconut Price: राज्यात चतुर्थीनिमित्त भाज्यांना मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून विविध प्रकारच्या फळ तसेच पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात बाजारात विक्री होत असून काही प्रमाणात दरात वाढ झाली आहे.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात चतुर्थीनिमित्त भाज्यांना मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून विविध प्रकारच्या फळ तसेच पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात बाजारात विक्री होत असून काही प्रमाणात दरात वाढ झाली आहे. चतुर्थीपूर्वीपासून नारळाचे वाढलेले दर देखील भडकलेलेच असून मध्यम आकाराचा नारळ अजूनही ५० ते ६० रुपयांना एक दराने विकला जात आहे.

भाज्यांसोबतच स्थानिक शेतकऱ्यांनी लागवड केलेली विविध पावसाळी पिकांचे उत्पादन आता बाजारात विक्रीसाठी येऊ लागले आहे. यात प्रामुख्याने चिबूड, तवशी, दोडगी, भेंडी, आदी भाज्या व फळे विकले जाते असून चिबूड आकाराप्रमाणे १५० रुपये प्रती नग तर छोट्या तवशांचा वाटा १०० रुपयांना विकला जात आहेत. गावठी भेंडी, दोडकी देखील विकली जात असून रानभाज्याही मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहेत.

पणजी बाजारातील भाज्यांचा दर

पणजी बाजारात कांदे, बटाटे तसेच टॉमेटो प्रती किलो ५० रुपये दराने विकले जात आहेत. भेंडी ८० रुपये किलो, कारली ८० रूपये, कोबी आणि फ्लॉवर ६० रुपये प्रती नग, पालेभाज्या २० रुपये प्रती जुडी दराने विकले जात आहे.

बाजाराच्या तुलनेत फलोत्पादन गाळ्यांवरील भाज्या काही अंशी स्वस्त आहेत. फलोत्पादनाच्या गाळ्यांवर प्रति किलो भेंडी ८४ रूपये, कोबी २१ रू, गाजर ४८ रू, चिटकी ६३ रू, बिन्स ७५ रू, कांदे २७ रू, बटाटे २९ रू तर टॉमेटो ४७ रुपये प्रती किलो दराने विकले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT