Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: महिलेचा पाठलाग करून धमकावल्या प्रकरणी एकाला अटक; पर्वरी पोलिसांची कारवाई

पर्वरी पोलिस ठाण्याच्या पथकाने वास्को येथे सापळा रचत आरोपीला पकडले.

Ganeshprasad Gogate

Goa Crime: गोव्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून नुकतीच एका महिलेचा पाठलाग करून तिला त्रास देण्याच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी एका तरुणाला अटक केल्याची माहिती हाती येतेय.

या घटनेसंबंधी पर्वरी पीआय राहुल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने तिचा मित्र ऍशले मॅन्युएल फर्नांडिस, वय-27 वर्षे हा तिचा पाठलाग करत असल्याची तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणी पोलिसांनी कलम 354, 509, 506(ii) अंतर्गत एफआयआर नोंदवून आरोपीला समन्स देखील बजावले होते.

मात्र असे होऊन देखील त्याने आपले कृत्य सुरूच ठेवले होते. उलट ऍशले याने तिला गंभीर परिणाम भोगायला तयार राहा अशी धमकी देखील दिली होती. तसेच तो तिच्या इन्स्टाग्राम सारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर लक्ष ठेवत असून तिला अश्लील मेसेज पाठवायचा.

त्यामुळे शेवटी पर्वरी पोलिस ठाण्याच्या पथकाने वास्को येथे सापळा रचत आरोपीला पकडले. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय सर्वेश भंडारी यांच्या देखरेखीखाली एसडीपीओ पर्वरी विश्वेश कर्पे आणि एसपी नॉर्थ निधिन वलसन यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT