Illegal Hill Cutting : हडफडेमध्ये बेकायदेशीर डोंगर कापणीसह 500 हून अधिक झाडांची कत्तल

संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
Illegal Hill Cutting
Illegal Hill CuttingDainik Gomantak
Published on
Updated on

Illegal Hill Cutting : हडफडेमध्ये अनधिकृत टेकडी व वृक्षतोडप्रकरणाला ऊत आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळतेय. झिमर म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागातील उतारावरील घनदाट झाडे असलेला बराच भाग अक्षरशः साफ करून या जागेतून रस्ता तयार करायचे काम सुरु झाले आहे.

विशेष म्हणजे हे काम गेल्या दहा दिवसांपासून मुख्य रस्त्यापासून सुमारे 200 मीटर अंतरावर सुरू आहे. या परिसरातील जेसीबीने सुरु असलेल्या कामांची माहिती स्थानिकांनी वॉर्ड सदस्याला तत्काळ माहिती दिली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले.

कळंगुटचे आमदार मायकल लोबो, हडफडेचे सरपंच रोशन रेडकर आणि पंचायत सदस्यांनी शनिवारी वन अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी जात परिस्थितीची पाहणी केली. यावेळी 500 हून अधिक झाडांची कत्तल केलेली निदर्शनास आली.

तसेच तेथील टेकडीचा बराचसा उत्तराचा भाग नष्ट करून रस्ता तयार करण्याचे काम सुरु होते. उपस्थित सर्वांनी नगर नियोजन मंत्री आणि मुख्य वनसंरक्षक यांना पत्र लिहून या सुरु असलेल्या बेकायदेशीर प्रकरणात सहभागी असलेल्यांवर त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

Illegal Hill Cutting
37th National Games: पदकाच्या शोधात गोव्याचा फुटबॉल संघ; घरच्या मैदानावर विजेतेपदासाठी प्रयत्नशील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com