Mhadai Forest Dainik Gomantak
गोवा

Mhadai Forest: म्हादई परिसर बहरतोय, वैशाख 'वणव्या'नंतर लाभली नवसंजीवनी

‘मार्च’मध्ये होते अग्नितांडव : पावसाळ्यात साट्रे गडाला मिळाला साज

गोमन्तक डिजिटल टीम

Mhadai Forest सत्तरी तालुक्यात मार्च महिन्यात म्हादईच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर आगीचे तांडव झाले होते. गोव्याबरोबरच आगीने सीमा भागातील कर्नाटक राज्यातही प्रवेश करीत वेढले होते.

पण आता जून महिन्यापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे म्हादईच्या भागात हळूहळू पालवी फुटू लागली आहे. साट्रे गावातील क्रांतिवीर दीपाजी राणे गडावरदेखील आता हिरवाई बहरत आहे.

साट्रे गावच्या गडाला क्रांतिकारी इतिहास आहे. मार्च महिन्यात पश्चिम घाटातील जैविक संपदा नष्ट होऊन सत्तरीचा पश्चिम घाट आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता.

ही आग जंगलातील सुक्या पाल्यापाचोळ्यामुळे व जोरदार वाऱ्यामुळे पसरत गेली होती. चरावणे, वाघेरी डोंगराचा परिसर हादेखील यात सापडला होता. तसेच केरी, मोर्ले येथील जंगलालाही आग लागली होती.

ती आग कर्नाटक सीमेवरील पारवडच्या जंगलातही पसरली होती. आता पावसाळी हंगामात डोंगरावर हिरवाई नटत आहे. त्यामुळे साट्रे गड व जवळील परिसर पुन्हा एकदा पूर्वीसारखा दिसत आहे.

वनराईवर आघात

साट्रे, देरोडे, झाडानी, कोदाळ अशा म्हादईच्या भागातून उस्ते, चरावणे, चोर्ला, सुर्ला भाग, हिवरे आदी म्हादईच्या पट्ट्यात आगीने तांडव केले होते.

त्यावेळी म्हादईच्या जंगलातील पशु, पक्षी, वेली, फुले, लहान मोठी झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. सुमारे पंधरा दिवस आगीचे प्रकार विविध ठिकाणी सुरूच होते. त्यामुळे वनराईवर आघात झाला होता.

क्रांतिवीरांची आठवण

साट्रे गडावर थांबून पोर्तुगिजांविरोधात सत्तरीचे क्रांतिवीर दीपाजी राणे यांनी चळवळ केली होती व पोर्तुगिजांना बराच घाम काढला होता. हा साट्रेचा गड पाहून या क्रांतिवीरांची आठवण येते.

साट्रे गडाच्या पायथ्याशी वसलेली साट्रे गावातील घरे, शेती, बागायती व गावच्या नजरेतून उंच माथ्यावर हा साट्रे गड इतिहासाची साक्ष देत उभा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! अजित पवारांच्या विमान अपघाताचं CCTV फुटेज आलं समोर; क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं VIDEO

Ajit Pawar: "दादा परत या"! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समर्थकांना अश्रू अनावर; बारामती दुःखात हरवली Watch Video

Antonio Costa: ''माझ्‍या कुटुंबाची मुळे गोव्यात'', युरोपच्या सर्वोच्च नेत्याचा 'गोमंतकीय' बाणा; CM सावंतांचं खास ट्विट VIDEO

Ajit Pawar Passed Away: "महाराष्ट्रानं कर्तबगार नेतृत्व गमावलं!" अजित पवारांच्या निधनावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह दामू नाईक, युरींनी वाहिली श्रद्धांजली

Goa Farming: शेती क्षेत्रातून महत्वाची माहिती! गोव्यात खरीप हंगामातील भाजीपाला लागवड घटली; आकडेवारी उघड

SCROLL FOR NEXT