गोवा

Valpoi Accident: वेळूस वाळपई मार्गावर स्कोडा गाडीची दुचाकीला धडक, भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

Valpoi Accident: या अपघाताची तीव्रता एवढी होती की स्कोडा गाडी रस्ता सोडून बाहेर जात 11 केव्ही वीजेच्या खांबाला धडकली.

Ganeshprasad Gogate

Valpoi Accident: भरधाव स्कोडा गाडी गाडीची दुचाकीला धडक बसून भीषण अपघात घडल्याची घटना वेळूस वाळपई रस्त्यावर घडलीय. या अपघातात डोंगुर्ली ठाणे येथील दुचाकीस्वार उल्हास गावकर हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

या अपघाताची तीव्रता एवढी होती की स्कोडा गाडी रस्ता सोडून बाहेर जात 11 केव्ही वीजेच्या खांबाला धडकली. या धडकेने तो खांब देखील मोडून पडला आहे.

गाईला वाचवण्याच्या नादात समोरून येणाऱ्या स्प्लेंडर मोटारसायकलला स्कोडाची धडक बसल्याचे कार चालक राजानं नाईक यांनी सांगितले.

या अपघातात डोंगुर्ली ठाणे येथील दुचाकीस्वार उल्हास गावकर हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना बांबोळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात गांवकर यांचे दोन्ही पाय जायबंदी झाल्याचे प्राथमिक वेरुत्त हाती आले आहे. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा दुसरा अपघात असून आज सोमवारी पहाटे मळा येथे सुरु असलेल्या मलनिस्सारण वाहिनीच्या चेंबरच्या खड्ड्यात भरधाव दुचाकी पडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहेत.

स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सुरु असलेल्या मळा येथील पिपल्स हायस्कूलजवळ मलनिस्सारण वाहिनीच्या चेंबरच्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला आहे.

या अपघातात मृत्यू झालेला युवक रायबंदर येथील असून पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT