Valpoi Belgaavi New Road Dainik Gomantak
गोवा

वाळपई-बेळगावला जोडणारा नवा मार्ग खुला; प्रवासाचे अंतर, वेळ घटणार, सुर्ला गावालाही होणार फायदा

सुरूवातीला वाळपईवरून बेळगावला जाण्यासाठी 70 कि.मी एवढे अंतर कापावे लागायचे त्यासाठी अंदाजे तीन तासांचा वेळ लागायचा.

Pramod Yadav

Valpoi Belgaavi New Road: वाळपई आणि शेजारी कर्नाटकातील बेळगावला जोडणारा नवा मार्ग खुला करण्यात आला आहे. नव्या मार्गामुळे वाळपई-बेळगाव अंतर तब्बल 30 किलोमीटने कमी झाले सून, प्रवासाचा वेळ दीड तासांवर आला आहे.

सुरूवातीला वाळपईवरून बेळगावला जाण्यासाठी 70 कि.मी एवढे अंतर कापावे लागायचे त्यासाठी अंदाजे तीन तासांचा वेळ लागायचा. नव्या मार्गामुळे येथील पर्यटनाचा देखील आस्वाद घेता येणार आहे.

ठाणे गावातील पाली येथून हा नवा मार्ग जातो. सध्या हलक्या वाहनांसाठी हा मार्ग खुला करण्यात आला असून, मार्गावर अवजड वाहनांसाठी बंदी घालण्यात आली आहे. नव्या मार्गावर अवजड वाहने धावताना दिल्यास त्याविरोधात सक्त कारवाई केली जाईल असा इशारा म्हादई वन्यजीव प्राधिकरणाने दिला आहे.

पालीतून जाणाऱ्या या मार्गामुळे सुर्ला गावाशी उत्तम कनेक्टेव्हिटी निर्माण झाली आहे. यापूर्वी पालीतून सुर्ला गावात जाण्यासाठी केरी मार्गे प्रवास करावा लागायचा. आणि हे अंतर सुमारे 35 किमी एवढे आहे.

वाळपईतील नव्या मार्गामुळे या भागातील विकासाला चालना मिळेल, शिवाय सुर्ला गावाशी चांगली कनेक्टेव्हिटी निर्माण होईल. असे मत पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना व्यक्त केले.

सुर्लाच्या भोवती असलेले विविध धबधबे पाहण्याची संधी पर्यटकांना मिळेल. तसेच, नैसर्गिक सौंदर्य देखील अनुभवता येईल. असे वनमंत्री विश्वजीत राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT