Baina Sewage Pump Breakdown Dainik Gomantak
गोवा

Goa Drainage Issue: सासमोळे-बायणा भागात दुर्गंधी; पंपिंग स्टेशनचा पंप बंद, 10 दिवसांपासून सांडपाणी नाल्यात

Baina Sewage Pump Breakdown: बायणा येथील सांडपाणी पंपिंग स्टेशनमधील पंप बिघाडल्याने सासमोळे-बायणा परिसरात गेल्या आठवडाभरापासून दुर्गंधीचे संकट निर्माण झाले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वास्को: बायणा येथील सांडपाणी पंपिंग स्टेशनमधील पंप बिघाडल्याने सासमोळे-बायणा परिसरात गेल्या आठवडाभरापासून दुर्गंधीचे संकट निर्माण झाले आहे. पंप बंद पडल्यामुळे सांडपाणी जवळील गटारे व मोठ्या नाल्यात सोडले जात असून, परिसरातील रहिवाशांना तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. काही नागरिकांनी याचा आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार केली आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, पंपिंग स्टेशनमधील पंप जुने झाल्याने वारंवार नादुरुस्त होत आहेत. पूर्वी येथे चार पंप होते. मात्र, सध्या केवळ दोन पंप कार्यरत आहेत. त्यापैकी एक पंप बिघडल्याने संपूर्ण यंत्रणेवर ताण आला आहे. दहा दिवसांपूर्वी पंप बंद पडल्याने स्टेशनमध्ये सांडपाणी साचू नये म्हणून ते बाहेर सोडण्यात येत आहे.

परिणामी नाल्यात आणि चेंबरांमधून सांडपाणी वाहू लागले असून परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी वाढली आहे. मावळते नगरसेवक नारायण बोरकर यांनी पंप दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला असला तरी समस्या अद्याप कायम आहे. नवीन पंप बसविण्याबाबत पत्रव्यवहार झाल्याचे सांगितले जात असले, तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. नागरिकांनी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

नागरिकांत संतापाची भावना

सासमोळे येथे सुरू असलेल्या नाल्याच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचल्याने कामगारांना काम करणे अशक्य झाले असून, त्यामुळे काम ठप्प झाले आहे. सांडपाण्याचा निचरा झाल्याशिवाय बांधकाम पुढे नेणे शक्य नसल्याचे कंत्राटदाराने स्पष्ट केले आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी होत असून, प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत चालली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT