Vagator Beach: काही दिवसांपासून किनारीभागातील बेकायदेशीर बांधकामाविरुद्ध पर्यटन खात्यासह सीआरझेडनेही कारवाई सुरु केली असून आज वागातोर समुद्र किनारी बेकायदेशीर बांधकामांविरोधात कारवाई केल्याचे समजतेय.
वागातोर किनाऱ्यावरील बेकायदेशीर बांधकामांचे प्रकरण बऱ्याच वर्षांपासून गाजत आहे. वागातोर किनाऱ्यावर गोवा पर्यटन विकास मंडळाच्या जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त केले असताना त्याच जागेवर पुन्हा बांधकामे करण्यात आल्याचे प्रकार घडले होते.
याप्रकरणी स्थानिक मच्छीमारांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. तसेच या प्रकाराविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती.
सर्व पुराव्यावरून उच्च न्यायालयाने ही बांधकामे पाडण्याचा आदेश दिला होता. मात्र न्यायालयाचा आदेश धुडकावून याठिकाणी बांधकाम करून व्यवसाय सुरु होते.
या बेकायदेशीर बांधकामाविरुद्ध तसेच येथील शॅक आणि या ठिकाणच्या रेस्टोरंटमधून रात्रभर मोठ्या आवाजातील संगीत लावून चालणाऱ्या धिंगाण्याविरुद्ध हणजूण, वागातोर येथील स्थानिकांनी याआधी कित्येकदा आवाज उठवला होता.
अखरे पर्यटन खात्याने सीआरझेडसह आज संयुक्तपणे कारवाई करत ही या बांधकामांवर जेसीबी चालवला आहे. रॉबर्ट कुतिन्हो व आंतोनियो डिसोझा यांच्या 'रोमियो लेक' या शॅकचे अवैध बांधकाम आज पर्यटन खात्याकडून पाडण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार शनिवारी ही कारवाई करण्यात आली.
तेथे बेकायदेशीरपणे व्यवसायही केला जात आहे, अशी याचिका स्थानिकाने उच्च न्यायालयात दाखल केली होती. सदर रेस्टॉरंट पाडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने डिसेंबर 2023 रोजी दिला होता. त्यानुसार आज शनिवारी सकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.