omicron variant

 

Dainik Gomantak 

गोवा

Goa Vaccination: 15 ते 18 वयोगटातील मुलांचं होणार लसीकरण

10 जानेवारीपासून हे लसीकरण (Vaccination) सुरु करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दैनिक गोमन्तक

देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी पुन्हा एकदा कोरोना निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. यातच आता गोवा सरकारने खबरदारी म्हणून ओमिक्रॉनचा (omicron variant) प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहे. परदेशातून गोव्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना पॉझिटीव्ह आढळणाऱ्या प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी रुग्णलयात भरती करण्यात येत आहे. केंद्र सरकारने (Central Government) जाहीर केल्याप्रमाणे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना ओमिक्रॉन विषाणूवरील तातडीचा उपाय म्हणून कोव्हॅक्सिनची लस देण्यात येणार आहे. राज्य प्रशासन आणि शिक्षण खात्याच्या वतीने ही लस सर्व शाळांमध्ये देण्याची तयारी सुरू आहे. 3 जानेवारीपासून ती देण्यात येईल अशी माहिती लसीकरण विभागाचे समन्वयक डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली आहे.

दरम्यान, पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांसाठी कोरोनावरील तातडीचा उपाय म्हणून भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सिन ही लस देण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार राज्याकडे 74 हजार 200 लसीच्या मात्रा आज पोहोचल्या आहेत. साधारणपणे गोव्यासाठी 72 हजार लसीच्या मात्रांची गरज आहे. लसीकरण 3 ते 5 जानेवारी दरम्यान राज्यातल्या बहुतांश शाळांमध्ये करण्यात येईल. यासाठी आरोग्य खात्याने शिक्षण विभागाला तशी सूचना काढली असून शाळा प्रशासनाच्या वतीने संबंधित विद्यार्थ्यांना तसे मेसेज पाठवण्यात आलेत. यासाठी पालकांकडून संमतीपत्र घेण्यात येणार असून हे संमती पत्र ही विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले आहे. त्यावर पालकांची सही अनिवार्य आहे. जर विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाल्यास हा डोस ६ आणि ७ जानेवारीला देण्यात येईल. मात्र, सध्या तरी 3 ते 5 जानेवारीचे लक्ष ठेवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhudargad Accident: गोव्याहून नेपाळकडे जाणाऱ्या बसचा अपघात! चालकाचे नियंत्रण जाऊन घुसली शेतात; 2 प्रवासी गंभीर जखमी

Horoscope: पैशाचा पाऊस पडणार, परदेशी जाण्याची संधी; 'या' राशींचे बदलणार भविष्य

Vinorda Theft: दरवाजा तोडला, दागिने-रोकड लंपास; दिवसाढवळ्या घरफोडीमुळे विर्नोड्यात खळबळ

Goa: शेतकऱ्यांसाठी दिलासा! ‘हजारी केळी’ बनली बागायतदारांसाठी ‘ढाल’; खेतींपासून होतोय बचाव

Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, किती खड्डे बुजविले?

SCROLL FOR NEXT