Goa Update Union Transport Minister : Nitin Gadkari  Dainik Gomantak
गोवा

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे गोव्यात आगमन

द्रीय मंत्री 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी गोव्याच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari ) यांचे आज सोमवारी 1 नोव्हेंबर 2021 रोजी गोव्यात (Goa) दाबोळी विमानतळावर आगमन झाले.त्यांचे शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो ( Mauvin Godinho) यांनी स्वागत केले. केंद्रीय मंत्री 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी गोव्याच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.

केंद्रीय मंत्री एनएच-66 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 566 वरील लोटली आणि वेर्णा आयडीसी मधील मिसिंग लिंकचे उद्घाटन करतील. तद्नंतर मंत्री बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देतील आणि टेलिमेडिसिन सेवांचे उद्घाटन करतील. संध्याकाळी दोनापावल येथील हॉटेल ताजमध्ये मंत्री गडकरी ‘गती शक्ती मास्टर प्लॅन’वर उद्योगपतींशी संवाद साधतील.

2 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्रीय मंत्री गडकरी क्रीडा खाते आणि दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी यांच्यामध्ये महत्त्वाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार आहेत. त्यानंतर गडकरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची आणि महामार्गाच्या कामांचा आढावा घेणार आहेत. आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. गडकरी 2 नोव्हेंबर 2021 रोजी गोव्यातून रवाना होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT