Together for University Members  Dainik Gomantak
गोवा

Goa University Election: प्राध्यापकाला मारहाणीची धमकी; अभाविप कार्यकर्त्याचे कृत्य

‘टुगेदर फॉर युनिव्हर्सिटी’ने वेधले लक्ष

दैनिक गोमन्तक

विद्यापीठातील निवडणूक रद्द प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. एका अभाविप संघटनेच्या कार्यकर्त्याने विद्यार्थी कल्याण संचालक असलेल्या प्राध्यापकांना कार्यालयातून बाहेर पडल्यास दंडुक्याने मारू अशी धमकी दिली.

जर हा विद्यार्थी प्राध्यापकांना धमकावू शकतो, तर विद्यार्थ्यांना देखील काहीही करू शकतो. त्यामुळे विद्यार्थी भयभीत झाले आहेत.

आम्हाला विद्यापीठात राजकारण आणायचे नाही. त्यामुळे कुलगुरूंनी या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी ‘टुगेदर फॉर युनिव्हर्सिटी’ संघटनेचे उमेदवार ऋषांक नाईक यांनी केली. ते गोवा विद्यापीठ आवारात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी गोवा विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष साहील गाड, अपूर्वा नाईक तसेच इतर विद्यार्थी उपस्थित होते.

ऋषांक नाईक पुढे म्हणाले, की विद्यापीठ निवडणुका या विद्यार्थ्यांच्या हितासाठी असतात, परंतु विद्येच्या मंदिरात असे अशोभनीय कृत्य केले आहे. पहिल्यांदा बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांना निवडणूक लढविण्यास कुलगुरू परवानगी देतात, नंतर पुन्हा आकस्मिकपणे निवडणुका रद्द केल्या जातात व सर्व निवडणूक प्रक्रिया नव्याने करणार असल्याचे जाहीर केले जाते हे चुकीचे आहे. आमचे ११ उमेदवार अपक्ष निवडून आले असल्याने हा आमच्यावर अन्याय असून जर विद्यापीठाने योग्य निर्णय घेतला नाही, तर आम्ही आंदोलन करू.

निवडणूक उमेदवारांना धमक्या

जो विद्यार्थी दंडुका घेऊन मारायला गेला, त्या विद्यार्थ्याने निवडणुकीतील आमच्या पॅनलच्या अनेक उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही जर आमच्या बाजूने आला नाही, तर निवडणुकाच होऊ देणार नसल्याचे त्या विद्यार्थ्याने सांगितले होते, असे अपूर्वा नाईक हिने सांगितले.

‘त्या’ विद्यार्थ्याला निलंबित करा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा अभाविपला पाठिंबा आहे. गोवा विद्यापीठात अभाविपचा कार्यकर्ता विद्यार्थी कल्याण संचालकांना लाकडी दांड्याने मारण्याची धमकी देतो. कुलगुरूंनी शिस्तभंग करणाऱ्या विद्यार्थ्याला निलंबित करावे, अशी मागणी नौशाद चौधरी यांनी केली.

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी

विद्यापीठ निवडणुका जाहीर झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आपले वर्ग चुकवून उत्साहात प्रचार केला, परंतु आकस्मिक निवडणुका रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे कष्ट वाया गेले. आम्ही एकूण २४ उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले होते, त्यातील ११ उमेदवार हे बिनविरोध निवडून आले होते.

त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा. सर्व निवडणूक प्रक्रिया रद्द न करता केवळ ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, त्या सुधारून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, अशी आमची मागणी असल्याचे ‘टुगेदर फॉर युनिव्हर्सिटी’ संघटनेचे पदाधिकारी तथा गोवा विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष साहील गाड यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या 'DGP'वर निलंबनाची कारवाई, Viral व्हिडिओनंतर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश

Indian Racing League: थ्रिल आणि ॲक्शन! मोपा विमानतळाजवळ रंगणार 'इंडियन रेसिंग लीग'चा थरार; 6 संघांमध्ये चुरस, 'येथे' पाहता येणार Live streaming

India Economy: भारत होणार श्रीमंत अर्थव्यवस्था! दरडोई उत्पन्न पोचणार 4000 डॉलरपर्यंत; वाचा एसबीआय रिसर्चचा Report

Vande Mataram Cyclothon: 25 दिवसांत 6553 किमीची मोहीम! ‘वंदे मातरम् सायक्लोथॉन’चा थरार; तारीख जाणून घ्या..

Goa Latest Updates: दुर्भाट, आडपई फेरीसेवेवर दाट धुक्यामुळे परिणाम

SCROLL FOR NEXT