Banastarim Accident Case: मेघना व तिच्या मुलाची घेतली तीन तास जबानी; परेशच्या कोठडीत वाढ

मेघना हिची गाडी मागील प्रवेशद्वाराने न्यायालयात नेण्यात आली.
Banastarim Bridge Accident
Banastarim Bridge AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Crime Branch Requests HC To Adjourn Hearing: बाणस्तारी अपघात प्रकरणातील मर्सिडीज कारमालक मेघना सावर्डेकर व तिच्या तीन मुलांचा जबाब नोंदवायचा असल्याने संशयित परेश सिनाय सावर्डेकर याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्याची क्राईम ब्रँचने केलेल्या विनंतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने परवानगी दिली.

त्यामुळे संशयित परेशला आणखी काही दिवस कोठडीतच रहावे लागणार आहे. मेघना व तिच्या एका मुलाची सुमारे तीन तास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी नोंद झाली.

मेघना सावर्डेकर व तिच्या एका मुलाने फोंडा येथील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर कलम 164 खाली जबानी दिली. या प्रकरणाचा तपास सध्या क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला असला, तरी म्हार्दोळ पोलिसांनी मेघना व तिच्या तीन मुलांच्या न्यायदंडाधिकाऱ्यांसमोरील जबानीसाठी अर्ज केला होता.

Banastarim Bridge Accident
Mahadayi Water Dispute: 24 वर्षे जुन्या आराखड्यावर जलसंपदाची भिस्त; सरकारला आली उशिरा जाग

त्यानुसार न्यायदंडाधिकाऱ्यांनी मेघना व एका मुलाचा २१ रोजी, तर इतर दोघांचा २३ रोजी जबाब नोंदवण्याची तारीख दिली होती. क्राईम ब्रँचने न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाठविलेली नोटीस मेघना व तिच्या मुलांना कालच देण्यात आली होती.

या नोटिशीनुसार मेघना हिने पोलिसांना बरोबर येण्याची गरज नाही, स्वतःहून आपल्या गाडीने फोंड्यात न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर होऊ असे पोलिसांना स्पष्ट केले होते.

... म्हणून त्यांची पुन्हा जबानी

म्हार्दोळ पोलिसांनी बाणस्तारी अपघातावेळी कारमध्ये असलेल्या मेघना सावर्डेकर व तिच्या तीन मुलांची अपघाताच्या तिसऱ्या दिवशी घरी जाऊन जबानी घेतली होती. त्या जबानीमध्ये मेघना हिच्या मुलांनी वडील कार चालवत होते असे सांगितले होते.

ही जबानी न्यायालयातील खटल्यावेळी बदलली जाऊ नये म्हणून म्हार्दोळ पोलिसांनी ती पुन्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यासाठी अर्ज केला होता.

Banastarim Bridge Accident
Porvorim News: माजी मंत्र्यांच्या मुलाची मैत्रिणीसह तरूणांसोबत फ्रीस्टाईल हाणामारी; पर्वरीतील बारमध्ये प्रकार, पाहा व्हिडिओ

मेघना मागील दाराने न्यायालयात!

सकाळी १०.३० वा. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर मेघना व तिचा एक मुलगा येणार असल्याने फोंडा न्यायालय इमारतीच्या आवारात सोशल मीडियाची गर्दी झाली होती. मात्र, मेघना हिची गाडी मागील प्रवेशद्वाराने नेण्यात आली.

पोलिसांनी अगोदरच ही पर्यायी सोय करून ठेवली होती. म्हार्दोळ पोलिस सावर्डेकर कुटुंबाला अभय देत असल्याचा आरोप केला गेल्याने हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आले. मात्र, क्राईम ब्रँचनेही या कुटुंबाला संरक्षण देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दिवाडीवासीयांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com