Goa University  Dainik Gomantak
गोवा

Goa University मधील धमकीप्रकरणी तक्रारच नाही! प्राध्यापकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न; तर कुलगुरूंचे कारवाईचे आश्‍वासन

विद्यापीठाची भूमिका संशयास्पद: ‘त्या’ विद्यार्थ्यांकडून माफी मागण्यास नकार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa University गोवा विद्यापीठात अचानक निवडणूक रद्द केल्याने अभाविपचा कार्यकर्ता असलेल्या विद्यार्थ्यांकडून दंडुका घेऊन प्राध्यापकाला धमकावण्याचा प्रकार घडला. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विद्यापीठातील काही संघटनांनी निषेध केला.

परंतु या विद्यार्थ्यांविरोधात कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही, ज्या प्राध्यापकाला धमकावण्यात आले, त्यांनीही तक्रार केली नसल्याने विद्यापीठ प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या प्राध्यापकासोबत ही घटना घडली, त्यांनाही विद्यापीठाची बदनामी होऊ नये, यासाठी हे प्रकरण वाढवायचे नाही. त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाईची मागणी संबंधितांनी केली नाही.

परंतु हे कृत्य करणाऱ्या विद्यार्थ्याला घडलेल्या प्रकरणाबाबत प्राध्यापकाची माफी मागण्यास सांगितले, असता त्याने माफी मागण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते.

विद्यापीठात दंडुका घेऊन प्राध्यापकाला धमकावणे प्रकरणाची दखल घेत आगशी पोलिसांनी संबंधित प्रकरणाविषयी चौकशी केली असता आम्हाला कोणी धमकी दिली नसल्याचे सांगितले, अशी माहिती पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांनी दिली.

कुलगुरूंचे कारवाईचे आश्‍वासन

विद्यार्थ्यांद्वारे अशा प्रकारे निवडणूक अधिकाऱ्याला धमकावणे चुकीचे आहे. या शिस्तभंग प्रकरणी त्या विद्यार्थ्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. या घटनेमुळे विद्यार्थी तसेच प्राध्यापकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

परंतु या प्रकरणी कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन यांनी आपण संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई करणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती गोवा विद्यापीठ शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. रामराव वाघ यांनी दिली.

ज्या विद्यार्थ्याचा व्हिडियो व्हायरल झाला आहे, त्यांनी कोणत्याच प्राध्यापकाला धमकावण्याचा प्रयत्न केलेला नाही. ते चुकीचे सांगितले आहे. एखाद्याच्या हातात दंडुका असणे म्हणजे तो मारण्यासाठी आहे, असे होत नाही. या प्रकरणाला चुकीचे वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

- धनश्री मांद्रेकर, अभाविप गोवा संयोजक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT