ABVP Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa University: "गोवा युनिव्हर्सिटी में कुछ भी चलता हैं?" लव्ह फॉर पेपर प्रकरणी विद्यार्थ्यांकडून 'आजच्या आज' कारवाईची मागणी

Goa University Paper Leak: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून देखील या प्रकरणाचा निषेद व्यक्त करण्यात आलाय

Akshata Chhatre

पणजी: काही दिवसांपूर्वी गोवा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र व उपयोजित विज्ञान विभागात एका सहाय्यक प्राध्यापकाने त्याच्या मैत्रिणीसाठी प्रश्नपत्रिकेची चोरी करत तिला प्रथम क्रमांक मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये आणि इतर सहा जणांनी साहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक याच्याविरोधात आगशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून देखील या प्रकरणाचा निषेद व्यक्त करण्यात आलाय आणि गटाने विद्यापीठाच्या बाहेर सोमवारी (दि.१७) कठोर कारवाईची मागणी करत आंदोलन राबवले होते.

ABVPचे म्हणणे काय?

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि गोवा विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलकडून विद्यापीठाच्या कुलगुरुंची भेट घेण्यात आली. या भेटीत विद्यार्थी समूहाकडून आजच्या आज निर्णय घेण्याची मागणी केलीये.

कुलगुरूंनी विद्यार्थी समूहाला दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाकडून या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी एक फॅक्ट चेकिंग कमिटी तयार करण्यात येणार आहे, मात्र या कमिटीमध्ये विद्यार्थ्यांपैकी एक सदस्य असावा आणि ह्याबद्दल विद्यापीठाने लेखी संमती द्यावी अशी मागणी विद्यार्थी गटाकडून करण्यात आलीये .

विद्यार्थ्यांच्या मते या घटनेमुळे त्यांच्या मनात भीती निर्माण झालीये, कोणालाही याबद्दल काही बोलू नये असा इशारा देण्यात आलाय पण असे प्रसंग घडत राहिल्यास विद्यापीठाचे नाव खराब होईल आणि इथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील भविष्यात प्रश्नांना सामोरं जावं लागेल. यासोबत जोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागत नाही तोपर्यंत त्या शिक्षकाला तात्पुरते निलंबित करावे अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

गोवा विद्यापीठातील प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेमुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) गोवा युनिट संतापले आहे. जबाबदार प्राध्यापक आणि इतरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत ते सोमवार (दि.१७) रोजी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

विद्यार्थ्यांकडून जर का एखादी चूक झाली तर त्यावर वेळीच कारवाई करण्यात येते इथे मात्र अजून काहीही हालचाल होत नाहीये, त्यामुळे 'चोरी करणारा चोर नाही, जो सापडतो तो चोर' अशी भूमिका विद्यापुथने घेतली असल्याचं विद्यार्थी म्हणाले. येत्या ४८ तासांत या प्रकरणाचा छडा लागणार आहे आणि या प्रकरणी दोषी आढळून आल्यास त्या मुलीला देखील निलंबित करावं असं विद्यार्थी म्हणतायत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT