Goa University Admission: MA, BEd प्रवेशासाठी मुदत वाढली! 27 फेब्रुवारी रोजी होणार पात्रता परिक्षा

Goa University MA BEd Admission: विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीच्या प्रवेशासाठी २, ९, १६, २३, ३० मार्च व ६ एप्रिल रोजी प्रवेश पात्रता चाचणी द्यावी लागेल.
Goa University Admission
Goa University MA BEdDainik Gomantak
Published on
Updated on

Last date for MA and BEd admission at Goa University

पणजी: गोवा विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये एमए (पदव्‍युत्तर अभ्यासक्रम) आणि बीएड अभ्यासक्रमासाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठीच्या ऑनलाइन प्रवेशअर्ज भरण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी होती, परंतु आता अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता अजून दोन दिवसांची मुदत वाढवून १२ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे.

तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपली पदवीची शाखा बदलून इतर शाखेतून पदव्‍युत्तर अभ्यासक्रमासाठी (एमए) प्रवेश मिळवायचा असेल तर त्यासाठी २७ फेब्रुवारी रोजी प्रवेश पात्रता चाचणी (ॲडमिशन रेंकीन टेस्ट) होणार आहे, असे गोवा विद्यापीठाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

इतर विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीच्या प्रवेशासाठी २, ९, १६, २३, ३० मार्च व ६ एप्रिल रोजी प्रवेश पात्रता चाचणी द्यावी लागेल. गोवा विद्यापीठाद्वारे आयोजित पात्रता चाचणी परीक्षा ही केवळ अभ्यासक्रम प्रवेशासाठी आहे.

Goa University Admission
Goa Education: तिसरी, सहावी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन धोरण लागू होणार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

...तर या विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार रद्द

जे विद्यार्थी पदवीच्या अंतिम वर्षात आहेत, ते देखील एमए तसेच बीएड प्रवेश पात्रता चाचणी परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना ही चाचणी परीक्षा देता येईल. अधिक माहितीसाठी गोवा विद्यापीठाचे संकेतस्थळ किंवा प्रशासकीय विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन गोवा विद्यापीठाने केले आहे.

Goa University Admission
Goa Education: विद्यार्थ्यांसाठी नवी अपडेट! मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात होणार परीक्षा; उन्हाळ्यामुळे शाळांच्या वेळापत्रकात होणार बदल

या विद्यार्थ्यांनाही संधी

जे विद्यार्थी एम.ए किंवा बी.एड अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकले नव्हते, तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणारे विद्यार्थी प्रवेश परीक्षा देऊ इच्छितात त्यांनी देखील अर्ज करायचे राहिल्यास त्यांना देखील अर्ज करून परीक्षा देता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com