Goa University LLB  Dainik Gomantak
गोवा

LLB Admission Scam :गोवा विद्यापीठाचा मोठा निर्णय! प्राचार्यांना पदच्युत करण्याचे ‘कारे’ला आदेश

एलएलबी प्रवेश घोळ : ग्रंथपालांवरही कारवाई निश्‍चित

गोमन्तक डिजिटल टीम

Goa University LLB कारे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य साबा दा सिल्वा यांनी आपल्या पुत्रावर मेहेरनजर करण्यासाठी एलएलबी प्रवेश परीक्षेत फेरफार व गफला केल्याबद्दल त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना पदच्युत करावे, असा आदेश देण्याचे विद्यापीठ व उच्च शिक्षण संचालनालयाने निश्‍चित केले आहे.

गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत प्राचार्य साबा दा सिल्वा यांनी परीक्षा पद्धतीत गफला केला व महाविद्यालयाचे ग्रंथपाल आनंद साळवे यांनाही भरीला घालून परीक्षा व्यवस्थेत ढवळाढवळ करण्यास भाग पाडले म्हणून त्यांच्यावरही कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाने व उच्च शिक्षण संचालनालयाने कळविल्यानुसार आता प्राचार्य व ग्रंथपालावर शिस्तभंग कारवाईचे प्रत्यक्ष पाऊल कारे विधी महाविद्यालयाला उचलावे लागेल.

तत्पूर्वी, गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाच्या आजच्या बैठकीत चौकशी समितीच्या प्रमुख डॉ. सविता केरकर यांनी कारे महाविद्यालयाच्या एलएलबी प्रवेश प्रकरणावर सादरीकरण केले.

कार्यकारी मंडळाच्या एका ज्येष्ठ सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, प्राचार्य साबा दा सिल्वा आणि ग्रंथपाल आनंद साळवे यांच्यावर शिस्तभंग कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली.

प्राचार्यांवर ‘अत्यंत कडक कारवाई’ करण्याची मागणी सदस्यांनी केली. ग्रंंथपालांनीही आपल्या कामाचा भाग नसताना प्राचार्यांच्या सांगण्यावरून यावेळी आणि यापूर्वीही परीक्षा पद्धतीत हस्तक्षेप केला व अनेक बाबी स्वत: हाताळल्या असल्याचे चौकशीत आढळून आले आहे.

उच्च शिक्षण संचालनालयाच्या नियमानुसार, विद्यापीठाने अत्यंत कडक कारवाईची शिफारस केल्यानंतर महाविद्यालयाने तिची कार्यवाही करायची असते; त्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाची मान्यता घ्यायची असते.

चौकशी समितीने आपल्या अहवालात जे विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यांची काहीच चूक नाही, तेव्हा त्या सर्वांना एलएलबी प्रथम वर्षात सामावून घ्यावे, अशी शिफारस केली होती; परंतु कार्यकारी मंडळाने ती मान्य केली नाही.

त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसवण्यात यावे, असा निर्णय घेतला. ही परीक्षा गोवा विद्यापीठातर्फे घ्यावी, यासाठी विद्यापीठाने आपला पर्यवेक्षक नेमावा व यापुढेही महाविद्यालयांकडे ही जबाबदारी न सोपविता, प्रवेश परीक्षेचा भार स्वत:च्या हिकमतीवर चालवावा, असा निर्णय घेतला. यावर्षी प्रवेश परीक्षेत ५० टक्के गुण बारावीच्या परीक्षेतील व उर्वरित ५० टक्के प्रवेश परीक्षेतील गृहीत धरले जाणार आहेत.

प्राचार्य साबा दा सिल्वा यांच्या पुत्राचा या गफल्यात किती सहभाग आहे, याची तपासणी करून त्याच्यावरही कारवाई करण्याची सूचना विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाने केली आहे.

आपल्या पुत्रावर मेहेरनजर व्हावी म्हणून प्राचार्यांनी परीक्षा पद्धत बदलली व परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर हेराफेरी केली, असे चौकशीत आढळून आले.

चौकशी समितीसमोर - ज्यांच्याकडे प्राचार्यांनी परीक्षा घेण्याची ‘जबाबदारी’ सोपविली होती, त्या सोनाली नाईक आणि ग्रंथपाल आनंद साळवे यांच्या जबान्या घेण्यात आल्या.

त्यात आढळून आले की, नाईक यांच्याकडे ‘जबाबदारी’ सोपविल्याचा दावा प्राचार्य करत असले, तरी ती ‘जबाबदारी’ अधिकृतपणे सोपविण्यासाठी रितसर पत्र दिलेले नव्हते.

ग्रंथपालही स्वत:ची जबाबदारी नसताना प्रश्‍नपत्रिका मिळविणे, उत्तरपत्रिका हाताळणे, प्रश्‍न तयार करणे आदी गोष्टींमध्ये गेली अनेक वर्षे बेजबाबदारपणे हस्तक्षेप करत होते. त्यांच्या मते, प्राचार्यांच्या सूचनेवरूनच ते ही कामे करीत.

यावर्षी जरी कारे व साळगावकर महाविद्यालयांवर प्रश्‍नपत्रिकेतील ५० - ५० टक्के प्रश्‍न तयार करण्याची जबाबदारी असली, तरी याव्यतिरिक्तही काही प्रश्‍न प्रश्‍नपत्रिकेत होते, ते ‘कोणी घुसडले’ असा प्रश्‍न चौकशी समितीला पडला.

शिवाय विद्यापीठाच्या नियमाविरुद्ध उत्तरपत्रिका पेन्सिलने लिहिण्यास सांगण्यात आले. परंतु साळगावकर विधी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका बॉलपेनने लिहिल्या आहेत.

कारे विधी महाविद्यालयातील विषय तज्ज्ञ शिक्षकांनी या परीक्षेसाठी प्रत्येकी १० प्रश्‍न तयार करून देण्यास सांगण्यात आले होते. त्यातील अनेकांना त्यांचे प्रश्‍न घेण्यात आले होते का, याचा पत्ता नव्हता व २० टक्के प्रश्‍न कोणी त्यात घुसडले, हा प्रश्‍न अधिकच संशय निर्माण करणारा ठरला. प्राचार्यांनी स्वत:च ते ‘घुसडले’ असावेत, असा संशय चौकशी समितीला आहे.

प्राचार्यांच्या पुत्राचे गुणही शेवटच्या क्षणी साळगावकर विधी महाविद्यालयाचा निकाल हाती आल्यानंतर बदलण्यात आल्याचे चौकशीत आढळले आहे. त्याचा या परीक्षेत तिसरा क्रमांक आला होता. पहिले दोन क्रमांक साळगावकर महाविद्यालयातर्फे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी पटकावले.

कारे महाविद्यालयात प्राचार्य पुत्र पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे! गंमत म्हणजे, साळगावकर महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लाल शाईच्या पेनने तपासल्या, तर कारेच्या शिक्षकांनी त्या पेन्सिलने तपासल्या आहेत. त्यामुळे हा गफला अधिक प्रकर्षाने सामोरे आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arohi Borde: गोव्याची आरोही बोर्डे चमकली, 68व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिंकले 'गोल्ड'!

Cash For Job Scam: '...सरकारी नोकरी घोटाळ्याला विरोधकही तेवढेच जबाबदार'; 'आयटक' नेते फोन्सेका यांचा हल्लाबोल!

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

SCROLL FOR NEXT