Goa University hostel mess contract cancelled Dainik Gomantak
गोवा

VIDEO: अन्नपदार्थांत अळ्या आणि कीडे, गोवा विद्यापीठ हॉस्टेल मेसचे कंत्राट अखेर रद्द; निकृष्ट खाद्यपदार्थप्रश्‍नी 'भाजयुमो'चा घेराव

Goa University hostel mess contract cancelled: विद्यापीठ मेसमधील अळ्या-किड्यांच्या प्रकारांवर भाजयुमोचा तीव्र निषेध केला. कुलसचिवांकडून कंत्राट तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा विद्यापीठातील हॉस्टेल मेसमधील अन्नपदार्थांत अळ्या आणि कीडे सापडण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने या मेसचे कंत्राट तात्काळ रद्द करावे, अशी मागणी करत भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात धरणे आंदोलन करून कुलसचिवांना घेराव घातला.

भाजयुमो तसेच इतर विद्यार्थी संघटनांनी केलेल्या तक्रारींची नोंद घेत कुलसचिव प्रा. सुंदर धुरी यांनी संबंधित कंत्राटदाराचे मेस व इतर ठिकाणी अन्नपदार्थ पुरविण्याचे कंत्राट तात्काळ रद्द करण्याचे निर्देश दिले.

याविषयी यापूर्वीही वारंवार तक्रार करून देखील गोवा विद्यापीठ कॅम्पस देखरेख समितीचे सदस्य सचिव तसेच सभासदांनी का कारवाई केली नाही, याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे आश्‍वासन दिले आहे. यावेळी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना कशाप्रकारे निकृष्ट अन्न थेट कुलसचिवांच्या समोर ठेवले. कुलसचिवांनी निर्णय घेईपर्यंत कार्यकर्ते कार्यालयात ठाम मांडून बसले.

आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही

कुलसचिव प्रा. सुंदर धुरी म्हणाले, अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणारी घटना घडायला नको होती; परंतु अन्नपदार्थांमध्ये अळ्या आणि इतर प्रकार मी देखील पाहिला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.

समितीने जी कारवाई करायला हवी होती, ती केली नाही. अन्न आणि औषध खाते आणि मी स्वतः अनेकदा कंत्राटदाराला या प्रकाराबाबत धारेवर धरले; परंतु आता त्याचे कंत्राट रद्द करून जे दोषी असतील त्यांच्यावर चौकशीनंतर कारवाई करण्यात येईल.

विद्यार्थ्यांना सुग्रास भोजन पुरवा

भाजयुमोचे अध्यक्ष तुषार केळकर म्हणाले, की आंदोलनानंतर कुलसचिवांनी मेसचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु मेस बंद केल्यानंतर विद्यार्थ्यांना जेवण पुरविण्याची तात्काळ तजवीज करावी.

जोपर्यंत विद्यार्थ्यांना योग्य अन्न मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाची तपासणी विद्यापीठाने केली नाही तर आम्ही स्वतः पुढाकार घेऊ. विद्यापीठ कॅम्पस देखरेख समितीने याप्रश्‍नी विद्यार्थ्यांनी तक्रार करूनही कारवाई का केली नाही, याची चौकशी व्हावी. याप्रकरणी आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही निवेदन देणार आहोत.

दोषींवर कठोर कारवाई हवी

अन्न आणि औषध प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी या मेसची तपासणी केली होती. तेव्हाही त्यांना निकृष्ट अन्नाविषयी अहवाल दिला होता. प्रशासनाने १८ चुका दाखवून दिल्या होत्या. असे असूनही या कंत्राटदारावर योग्य कारवाई केलेली नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याच्या या प्रकारात जे सामील आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करू, असे केळकर म्हणाले.

याप्रकरणी ‘एफडीए’ने या कॅन्टीनला तात्काळ टाळे ठोकण्याचे आदेश दिले असून सर्व त्रुटी दूर करून ‘अनुपालन अहवाल’ सादर करण्यास सांगितले आहे. हा अहवाल मिळाल्यानंतरच पुढील चौकशी व पाहणी करून कॅन्टीन सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती एफडीएच्या संचालक श्वेता देसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT