Goa University Professor Scandal Dainik Gomantak
गोवा

Goa University: राजकीय वरदहस्तामुळे कारवाई टाळली का? पेपर ‘लिक’प्रकरणी शेट्ये यांचा सवाल, 'त्या' प्राध्यापकाविरुद्ध तक्रार दाखल

Goa University Paper Leak: नाईक याने विद्यार्थी असलेल्या आपल्या प्रेयसीला उत्तीर्ण करण्याच्या हेतूने भौतिकशास्त्र विभागात जाऊन चोरी करून तिला प्रश्‍नपत्रिका दिली होती.

Sameer Panditrao

Goa University Professor Paper Leak Case

तिसवाडी: गोवा विद्यापीठात डुप्लिकेट चाव्यांद्वारे भौतिकशास्त्र विभागातून प्रश्‍नपत्रिका चोरून त्या आपल्या प्रेयसीला दिल्याचा आरोप करत आज सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये आणि इतर सहा जणांनी साहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक याच्याविरोधात आगशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तसेच भारतीय न्याय संहितेनुसार प्रणव नाईक याच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. पुढील २४ तासांत गोवा विद्यापीठाने या प्रकरणाची दखल न घेतल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जाण्याचा इशाराही शेट्ये यांनी दिला आहे.

नाईक याने विद्यार्थी असलेल्या आपल्या प्रेयसीला उत्तीर्ण करण्याच्या हेतूने भौतिकशास्त्र विभागात जाऊन चोरी करून तिला प्रश्‍नपत्रिका दिली होती. हे प्रकरण काही महिन्यांपूर्वी घडल्याने याची संपूर्ण माहिती विद्यापीठ प्रशासनाला होती; परंतु अगोदरच दर्जा घसरलेल्या विद्यापीठाची आणखी नाचक्की होऊ नये म्हणून नाईक याला केवळ तंबी देऊन सोडण्यात आले होते.

नाईक याला एका माजी मंत्र्याचा वरदहस्त लाभल्याने त्याच्या विरोधात कारवाई करण्याचे टाळले का, असा प्रश्न शेट्ये यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात दैनिक ‘गोमन्तक’ने वृत्त प्रसिद्ध केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

याविषयी आगशी येथे पत्रकारांशी संवाद साधताना सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये म्हणाले, ‘प्रणव नाईक याने प्रश्‍नपत्रिका चोरून आपल्या प्रेयसीला देऊन नियमभंग केला आहे. भौतिकशास्त्र विभागात चोरी करण्याचे गंभीर प्रकरण घडूनही त्याच्यावर कारवाई झालेली नाही. याची चौकशी झालीच पाहिजे.

प्रणवचा फोन, इमेल तपासा!

शेट्ये म्हणाले की, ‘तक्रार नोंद करूनही पोलिसांनी तपास सुरू केला नाही, तर प्रथम उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात येईल. तरीही कारवाई झाली नाही, तर आम्ही जिल्हा आणि सत्र न्यायालयात जाणार आहोत. या प्रकरणाकडे काणाडोळा करून चालणार नाही. कारण हे प्रकरण गंभीर आहे. प्रणव नाईक याचा फोन, तसेच ईमेल पडताळून पाहिल्यास त्यात त्याची प्रेयसी आणि माजी मंत्री यांच्याशी झालेला संवाद मिळेल.’

यापूर्वीही एक प्रकरण दाबले

‘यापूर्वी गोमेकॉतील एक डॉक्टरनेही पेपर लिक केला होता. हे प्रकरण देखील गोवा विद्यापीठाने दाबले होते. पोलिसांनी देखील हे प्रकरण बंद केल्याने ते पुन्हा खुले करण्यासाठी आम्ही जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विद्यापीठात ही प्रकरणे नित्याचीच झाल्याने ही चिंतेची बाब आहे’, असे काशिनाथ शेट्ये यावेळी म्हणाले.

पुन्हा परीक्षा घ्या!

संबंधित विषयाची प्रश्‍नपत्रिका फुटल्यामुळे यातून दुसऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने ही परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी काशिनाथ शेट्ये यांनी केली आहे.

‘वास्तुकला’चा निकाल चुकीचा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा विद्यापीठाचा दर्जा घसरण्यामागे अनेक कारणे असून त्यात अभ्यासक्रमात सातत्याने होत असलेल्या चुका हे एक महत्त्वाचे कारण आहे. एकेकाळी गोवा विद्यापीठ हे देशातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक होते; परंतु गेल्या १० वर्षांत त्याची घसरगुंडी सुरू आहे. गोवा वास्तुकला महाविद्यालयाचा निकाल पूर्णत: चुकल्याची धक्कादायक गोष्ट घडली आहे. हे प्रकरण देखील विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने दाबले. येत्या काही दिवसांमध्ये हे प्रकरणही बाहेर पडण्याची शक्यता आहे.

गोवा विद्यापीठात घडलेल्या या घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी आम्ही उद्या (सोमवारी) बैठक घेणार आहोत. ही बाब कोणीच माझ्या निदर्शनास आणून दिली नाही. आम्ही याविषयी चौकशी करू. त्यात तथ्य आढळल्यास प्राध्यापकावर कडक कारवाई करण्यात येईल.
प्रा. डॉ. हरिलाल मेनन, कुलगुरू, गोवा विद्यापीठ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT