Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa University: गोवा विद्यापीठातील प्रश्‍नपत्रिका चोरी प्रकरणातील प्राध्यापकाचा 'दुसऱ्यांदा' जीवन संपवण्याचा प्रयत्न

Pranav Naik Case: प्रश्‍नपत्रिका चोरी प्रकरणातील चौकशीत दोषी आढळून आलेला प्राध्यापक प्रणव नाईक याने सादोळशे येथील दीडकीतार पुलावरून पाण्यात उडी घेऊन जीवनप्रवास संपविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

Sameer Panditrao

काणकोण/मडगाव: गोवा विद्यापीठातील प्रश्‍नपत्रिका चोरी प्रकरणातील चौकशीत प्रथमदर्शनी दोषी आढळून आलेला भौतिकशास्त्र विभागाचा प्राध्यापक प्रणव नाईक याने सादोळशे येथील दीडकीतार पुलावरून पाण्यात उडी घेऊन जीवनप्रवास संपविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, तो असे करणार याची कल्पना यापूर्वीच काणकोण पोलिसांना असल्याने त्याच्या मागावर ठेवलेल्या पोलिसांनी त्याला पाण्याबाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वीही मार्च महिन्यात ही पेपरफुटीची गोष्ट उजेडात आली होती, त्यावेळीही त्याने असाच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याने काणकोणमध्येच येऊन असा प्रयत्न केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव काल रात्रीपासून बेपत्ता झाला होता. त्यामुळे आज सकाळी त्याच्या पत्नीने म्हापसा पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याचे लोकेशन तपासून पाहिले असता तो काणकोण येथे दिसून आल्याने म्हापसा पोलिसांनी काणकोणचे पोलिस निरीक्षक हरीश राऊत देसाई यांना सतर्क केले. यापूर्वीही प्रणवने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती असल्याने पोलिसांनी कित्येक ठिकाणी पोलिसांना पाठवून सकाळपासूनच गस्त सुरू केली होती.

नदीपात्रात उडी घेतली; पण...

आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास प्रणव हा सादोळशे येथे नदीवरील पुलावर आला. त्याने पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने नदीपात्रात उडी घेतल्यानंतर त्याठिकाणी आधीच तैनात केलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्याला नदी पात्राबाहेर काढले. नंतर त्याला काणकोण पोलिस ठाण्यात आणले. तोपर्यंत त्याचे नातेवाईकही काणकोण येथे पोहोचले. समजूत काढून त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन केले, अशी माहिती पोलिस निरीक्षक हरीश राऊत देसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT