Goa University  Dainik Gomantak
गोवा

गोवा विद्यापीठाने 'टर्म ब्रेकच्या' तारखांमध्ये केला बदल

केवळ अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाइन घेतल्या जाणार आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑफलाइन परीक्षा तीन आठवड्यांनी पुढे ढकलल्यानंतर गोवा विद्यापीठाने (GU) टर्म ब्रेकच्या तारखांमध्ये बदल केला आहे. आता 7 फेब्रुवारीपासून ऑफलाइन परीक्षा सुरू होणार असल्याने 24 ते 29 जानेवारी या कालावधीत विद्यार्थ्यांना (Students) टर्म ब्रेक दिला जाईल. (Latest Goa University News Updates)

गोवा विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार, टर्म ब्रेक 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी ऐवजी 24 जानेवारी ते 29 जानेवारी पर्यंत असेल. केवळ अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाइन घेतल्या जाणार आहेत. कोविड-19 (COVID-19) मुळे या परीक्षा 7 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उर्वरीत सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाइन पद्धतीने घेतल्या आहेत.

गोवा विद्यापीठ (Goa University) आणि उर्वरीत महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांची परीक्षा देखील ऑफलाइन घेतली जाणार आहे. दरम्यान, गोवा विद्यापीठने आणखी एका परिपत्रकात म्हटले आहे की, जे विद्यार्थी या परीक्षेच्या एक किंवा अधिक पेपरला बसू शकत नाहीत त्यांच्यासाठी विशेष परीक्षा घेण्यात येतील. सार्वजनिक वाहतूक नसणे, कुटुंबातील सदस्य कोविड पॉझिटिव्ह असणे किंवा आजारी विद्यार्थी विशेष परीक्षेला बसण्यास पात्र असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assmbly Live: डिलिव्हरी एजन्सी वापरत असलेल्या वाहनांवर इतर राज्यांच्या नोंदणी प्लेट

नातं वाचवण्यासाठी करिश्मा-संजयची गोवा ट्रीप! करीनाचा खुलासा चर्चेत, म्हणाली, 'त्यांना समस्या होत्या'

Sara Tendulkar: 1137 कोटी… सचिनच्या लेकीचा 'मास्टरस्ट्रोक', पर्यटनाला चालना देण्यासाठी करणार काम

IND vs ENG: रोहित-विराटला जमलं नाही ते शुभमन गिल करुन दाखवणार, ओव्हलवर इतिहास रचण्याची संधी; पहिल्यांदाच घडणार 'हा' पराक्रम

मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं, ग्रामसेवकावर Strict Action; सरदेसाईंकडून प्रमोद सावंतांचे कौतुक, रायच्या 'सायको' सचिवाचीही केली तक्रार

SCROLL FOR NEXT