Baltic Sea Research Team, CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Blue Economy: 'ब्ल्यू ईकॉनॉमी’साठी गोवा विद्यापीठाचा जर्मन संस्थेशी करार! स्थानिकांना लाभ मिळवून देण्यासाठी होणार प्रयत्न

Cm Pramod Sawant: प्रगत तंत्रज्ञान पुरवणे महत्त्वाचे असून त्या अनुषंगाने हा करार अतिशय महत्त्वाचा असल्याचे संचालक ओलिवर झेलेन्स्की यांनी सांगितले.

Sameer Panditrao

Baltic Sea research in Goa

पणजी: गोव्याचे समुद्राशी अतूट नाते आहे. राज्यात पारंपरिक मत्स्यव्यवसाय, पर्यटनाचे नियोजन तसेच आपल्या भविष्यातील पिढींसाठी समुद्र संशाधन राखून ठेवत शाश्‍वत ‘ब्ल्यू ईकॉनॉमी’ला चालना देण्यासाठी गोवा विद्यापीठ आणि लिबनिझ इन्स्टिट्यूट फॉर बाल्टिक सी रिसर्च, वॉर्नमुएंडे, जर्मनी सोबतचा सामंजस्य करार महत्त्वाचा ठरेल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

गोवा विद्यापीठातील रसायनशास्त्र सभागृहात आयोजित गोवा विद्यापीठ आणि लिबनिझ इन्स्टिट्यूट फॉर बाल्टिक सी रिसर्च, वॉर्नमुएंडे, जर्मनी या संस्थेशी सामंजस्य करारावेळी बोलत होते.

यावेळी पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन, इन्स्टीट्यूटचे संचालक डॉ. ओलिवर झेलन्सी, कुलसचिव प्रा. सुंदर धुरी व इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, समुद्र संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समुद्र संशोधन वाढविणे, आणि पर्यावरण सांभाळणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिकांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न

भारत आणि जर्मनीचे मागील ६० वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. या सामंजस्य करारातून होणारे कार्य, संशोधनाच्या माध्यमातून स्थानिकांना कसा लाभ मिळवून देता येईल याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत. समुद्र विज्ञानात नव्याने संशोधन करणाऱ्या पिढीपर्यंत आता पर्यंत झालेले संशोधन तसेच प्रगत तंत्रज्ञान पुरविणेही महत्त्वाचे असून त्या अनुषंगाने हा करार अतिशय महत्त्वाचा असल्याचे संचालक ओलिवर झेलेन्स्की यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT