Goa Ujjwala Scheme Dainik Gomantak
गोवा

Goa Ujjwala Scheme: दिवाळी आली, तरी 'उज्ज्वला'चे पैसे नाहीत! 1.61 लाख अर्जदार प्रतीक्षेत; 48.36 कोटींचे अनुदान रखडले

Goa Ujjwala Scheme Pending Payments: राज्य सरकारने गणेश चतुर्थीपूर्वी गोवा उज्ज्वला योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा केली होती.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्य सरकारने गणेश चतुर्थीपूर्वी गोवा उज्ज्वला योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा केली होती. मात्र, गणेश चतुर्थी उलटून दिवाळी आली तरी हजारो नव्हे, तर तब्बल १ लाख ६१ हजार १८५ अर्जदार या आर्थिक लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.

सणासुदीच्या काळात आर्थिक मदतीची अपेक्षा असलेल्या महिलांना अद्यापही प्रतीक्षाच करावी लागत आहे. गॅस ग्राहकांना तीन सिलिंडरच्या खर्चापोटी प्रत्येकी ३ हजार रुपये या योजनेतून मिळणार आहेत.

लाभ मिळालेल्या ९६ हजार ६०५ जणांमध्ये गृह आधार योजनेच्या ६० हजार ७३४ लाभार्थ्यांचा समावेश आहे. तर दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतील २९ हजार ८७४ महिला आणि ५ हजार ९९७ पुरुष लाभार्थ्यांना आर्थिक साहाय्य मिळाले आहे. अशा प्रकारे एकूण ९६ हजार ६०५ जणांच्या खात्यावर प्रत्येकी तीन हजार रुपये जमा केले आहेत.

आकडे बोलतात

  एकूण प्राप्त अर्ज : २,५९,९०७

  ‘जीईएल’कडे पाठविलेले अर्ज : २,५७,७९०

  आतापर्यंत लाभ मिळालेले : ९६,६०५

  लाभाच्या प्रतीक्षेत : १,६१,१८५

  प्रत्येक लाभार्थ्याला मिळणारी रक्कम : ३,००० रुपये

  प्रलंबित लाभासाठी आवश्यक निधी : ४८.३६ कोटी रुपये

३७.५ टक्के अर्जदारांनाच लाभ

५ नोव्हेंबरपर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार या योजनेसाठी राज्यात एकूण २ लाख ५९ हजार ९०७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी २ लाख ५७ हजार ७९० अर्जांची माहिती गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडे (जीईएल) पाठविली आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ९६ हजार ६०५ लाभार्थ्यांनाच आर्थिक साहाय्य मिळाले आहे. म्हणजेच ‘जीईएल’कडे पाठविलेल्या अर्जांपैकी सुमारे ३७.५ टक्के अर्जदारांनाच लाभ मिळाला असून, उर्वरित ६२.५ टक्के अर्जदार प्रतीक्षेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi Captain: वयाच्या 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशी बनला कर्णधार! क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

Goa My Home Scheme: गोमंतकीयांना दिवाळीची भेट! 'माझे घर', मुंडकार हक्कांसह जमीन प्रकरणे दोन महिन्यांत निकाली काढणार

Mohammed Shami Test Cricket Retirement: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; भावनिक पोस्ट करत म्हणाला, 'माझं एकच स्वप्न होतं...'

Goa Politics: निवडणुकीला 3 महिने बाकी, भाजपचा मोठा निर्णय; संकल्प आमोणकर घेणार मंत्रिपदाची शपथ

Horoscope: शनिवारचे राशिभविष्य! मेष, मिथुनसह 4 राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; नोकरीपासून व्यवसायापर्यंत होणार मोठा आर्थिक फायदा

SCROLL FOR NEXT